
साखर कारखाने, दूध प्रकल्पांचे सांडपाणी नदीला जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते, त्यासाठी यंदा माळेगावने शून्य टक्के प्रदूषण पातळी गाठणारी यंत्रणा बसविल्याने पवार यांनी समाधान व्यक्त केले.
माळेगाव (बारामती) : माळेगावचा यंदा ऊस गळीत हंगाम गतवर्षीच्या तुलनेत उत्तम चालल्याने खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (ता.२७) कारखान्याच्या कारभाराचे ऑडिट करण्यासाठी संचालक मंडळाची बैठक घेतली. ५६ दिवसात सुमारे साडेचार लाख टन झालेले गळीत, वाढती डेची १०.५१ टक्के रिकव्हरी, ६० कोटीहून अधिक डिस्टरलीचे उत्पन्न, तर सहवीज निर्मितीचे ३० कोटींपेक्षा अधिक रकमेचे उत्पन्न यंदा कारखान्याला मिळू शकते, असा विश्वास अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष तानाजी कोकरे, एमडी राजेंद्र जगताप आदी संचालक मंडळाने दिल्याने पवार यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
- 'गो कोरोना गो' नंतर आता 'नो कोरोना नो'; रामदास आठवलेंचा नवीन नारा
विशेषतः जरेंडेश्वर कारखान्याचे विस्तारिकण साडेसात हजार टनापर्यंतचे, तसेच ३२ मॅगॅवाॅट विज निर्मिती प्रकल्पाचे टेंडर १४० कोटींमध्ये झाले, परंतु माळेगावचा प्रतिदिनी अडीच हजार टन गाळप क्षमता वाढविण्यासाठी व १४ मॅगाॅवॅट वीजेच्या प्रकल्पाचे विस्तारिकरण करण्यासाठी सुमारे १८० कोटी खर्च कसा झाला, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. त्यामुळे नाव न घेता पवार यांनी या मुद्द्यावर जुन्या संचालक मंडळाचा (तत्कालिन अध्यक्ष रंजन तावरे, संचालक चंद्रराव तावरे) कान पकडण्याचा प्रयत्न केला.
खरेतर माळेगावचे विस्तारिकरण व्यवस्थित झाले असते तर गतवर्षी (सन २०१९-२०)ची लक्षणीय रिकव्हरी घसरली नसती आणि शेतकऱ्यांचे अर्थिक नुकसान टळले असते. त्यावर मार्ग काढण्यासाठी मी स्वतः व्हीएसआय संस्थेचे तज्ज्ञ अधिकारी यंदाच्या गळीत हंगामाच्या सुरवातीला पाटविल्याने यंत्रसामुग्रीमधील त्रुटी निघून गेल्याने सध्या कारखाना सुस्थितीत म्हणजे प्रतिदिनी साडेआठहजार में.टनाने गाळप चालत आहे, अशी आठवण उपस्थित संचालक मंडळाला पवार यांनी करून दिली.
- भाजपला अहंकार नडला; 6 वर्षात 19 मित्रपक्षांनी सोडली साथ!
साखर कारखाने, दूध प्रकल्पांचे सांडपाणी नदीला जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते, त्यासाठी यंदा माळेगावने शून्य टक्के प्रदूषण पातळी गाठणारी यंत्रणा बसविल्याने पवार यांनी समाधान व्यक्त केले. शिरवली हद्दीतील काळ्या ओढा स्वच्छ करण्यासाठी त्यांनी शासनाच्या यांत्रिकी विभागाची मशिनरी देत असल्याचे सांगितले. यावेळी संचालक केशवराव जगताप, अनिल तावरे, योगेश जगताप, नितीन सातव, राजेंद्र ढवाण, तानाजी देवकाते, सागर जाधव, संगिता कोकरे, विश्वस्त रविंद्र थोरात, राष्ट्रवादीचे अध्यक्ष संभाजी होळकर, सचिन सातव, संदीप जगताप, रविराज तावरे, रणजित तावरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
- Rajinikanth health update: सुपरस्टार रजनीकांत यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज
सभासदांमधून प्रतिसाद मिळालेले निर्णय
माळेगावचे अध्यक्ष तावरे यांच्या संचालक मंडळाने यंदा विविध योजना सभासदांच्या हिताच्या अमलात आणल्याचे अजित पवार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. सोमेश्वरच्या तुलनेत माळेगावची डेची रिकव्हरी १०.५१ टक्केपर्य़ंत वाढली आहे. सभासदांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी मेडीक्लेम पाॅलिसी सुरू केली, दोन महिन्यात ५६ सभासदांना या योजनेचा लाभ झाल्याने ते वेदनामुक्त झाले आहेत. यंदाच्या चालू गळीत हंगामामध्ये ऊस तोडणीचे उत्तम नियोजन झाले, त्यामध्ये ७५ टक्के सभासदांनचा ऊस गाळप केल्याने अडसाली ऊस कार्य़क्षेत्रातील डिसेंबरमध्येच संपविण्यात यश आले. परिणामी यंदा सभासदांना मोकळ्या शिवारात गहू व हरभाऱ्यासह चारा पिके घेणे सोयीचे झाले.
पवार यांच्या सूचना
साखर विक्रीवर लक्ष केंद्रीत करा, इथेनाॅल निर्मितीवर भर द्या, वीज निर्यात वाढविण्याची गरज, बगॅस सेव्हिंग व्हावा, उत्पन्नाच्या तुलनेत इथेनाॅल स्टोअरेज टॅंक वाढविणे, माॅलॅसेस टाक्यांची व्यवस्था सुरक्षित ठिकाणी असणे आवश्यक असल्याच्या सूचना पवार यांनी कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप आणि संचालक मंडळाला दिल्या.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)