esakal | 'गो कोरोना गो' नंतर आता 'नो कोरोना नो'; रामदास आठवलेंचा नवीन नारा
sakal

बोलून बातमी शोधा

Ramdas_Athawale

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही मागणी आम्ही पूर्वीपासून करत आलो आहेत. त्यांच्या मागणीला आमचा पाठिंबा असून, त्यांना न्याय मिळाला पाहिजे.

'गो कोरोना गो' नंतर आता 'नो कोरोना नो'; रामदास आठवलेंचा नवीन नारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : रामदास आठवले यांनी दिलेली 'गो कोरोना गो' घोषणा चांगलीच चर्चेत आली होती. त्यावर आठवले म्हणाले, मी गो कोरोना म्हणालो होतो, आता कोरोना जात आहे, पण आता कोरोनाचा नवा स्ट्रेन येत असल्यामुळे मी 'नो कोरोना नो' अशी घोषणा देत आहे, पण तो येणार नाही असे नाही, त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.

पुणे : नामवंत सराफी व्यावसायिक मिलिंद मराठे यांचे निधन​

आठवले पुढे म्हणाले, ''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सरकार चालविताना मोठी कसरत होत आहे. महाविकास आघाडीतील बिघाडीमुळे
कॉंग्रेस पक्ष एक दिवस पाठिंबा काढून घेईल. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमच्यासोबत येऊन सत्ता स्थापन करतील,'' असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला.

पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत रामदास आठवले होते बोलत होते. रिपाइचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, राज्य सचिव बाळासाहेब जानराव, पश्‍चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर आदी यावेळी उपस्थित होते.

भाजपला अहंकार नडला; 6 वर्षात 19 मित्रपक्षांनी सोडली साथ!​

"केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी चर्चेचे दार खुले ठेवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नवे शेतकरी कायदे रद्द करण्याचा हट्ट सोडावा. कॉंग्रेसने त्यांच्या जाहिरनाम्यात शेतकरी कायदा सुधारण्याचे आश्‍वासन दिले होते, पण आता तेच शेतकऱ्यांना फुस लावत आहेत. एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे नागरिकांनी गर्दी करू नये. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वांनी घरी थांबावे. महाविकास आघाडी सरकार येऊन एक वर्ष झाले तरी भिडे, एकबोटे यांच्यावर कारवाई करण्याबाबत मूग गिळून गप्प बसले आहेत.'' असे आठवले यांनी सांगितले.

Rajinikanth health update: सुपरस्टार रजनीकांत यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

रिपाईची नव्याने सदस्य नोंदणी करण्याचे काम हाती घेतले असून, 26 जानेवारी पर्यंत 20 लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट आहे. ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत निवडणुका लढविण्यासाठी भाजपसोबत लढविण्यास रिपाइ तयार आहे.

मराठा समाजाची मागणी मान्य व्हावी
राज्य सरकारला मराठा आरक्षणासंदर्भात बाजू मांडता आली नाही, त्यामुळे "एसईबीसी' आरक्षणावर स्थगिती आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही मागणी आम्ही पूर्वीपासून करत आलो आहेत. त्यांच्या मागणीला आमचा पाठिंबा असून, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, असे आठवले यांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image