'पोपटासारखं बोलणाऱ्यांकडं दुर्लक्ष करा'; अजित पवारांनी काढला काँग्रेसला चिमटा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

यंदा अनुभवी चेहऱ्यांबरोबरच नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे, असे सूचक वक्तव्यही यावेळी पवार यांनी केले.

पुणे : "काहीजण स्वत:हून उठतात आणि काहीही जाहीर करतात. पक्ष त्यांना तिकीट देईल की नाही, यांची माहिती नाही, पण पोपटासारखे बोलतात. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. आगामी महापालिकेच्या निवडणुका या महाविकास आघाडीने एकत्रित लढवियाच्या की नाही, हे तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते ठरविणार आहेत,'' अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांची रविवारी (ता.२२) टिंगल केली. 

'मला चंपा म्हणता, ते चालतं का? चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला सवाल​

आगामी महापालिका निवडणुका तिन्ही पक्षांनी एकत्र लढविण्याबाबतची चर्चा आहे. मात्र शहर कॉंग्रेसमधील काही नेते मंडळी त्याला विरोध करीत असून कॉंग्रेसने स्वबळावर निवडणुका लढवाव्यात, असा आग्रह धरीत आहे. पदवीधर मतदार संघातील पक्षाचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात पवार यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांची टिंगल केली.

"पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पदवीधरची निवडणूक संपल्यानंतर लगेचच त्यांच्या तयारीला लागा,'' अशा सूचनाही पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिल्या. यंदा अनुभवी चेहऱ्यांबरोबरच नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे, असे सूचक वक्तव्यही यावेळी पवार यांनी केले. 

Big Breaking: महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले संकेत​

मागील दहा वर्ष महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा महापौर होता. मागील वेळेस लाट आली, असे सांगून पवार म्हणाले, "अनेक सहकारी आपल्याला सोडून गेले. दबावाने आणि प्रलोभने दाखवून त्यांना घेण्यात आले. गेल्या चार वर्षात महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा कारभार पुणेकरांनी पाहिला, स्मार्ट सिटीचे काय झाले. विधानसभा निवडणुकीत पक्षाचे दोन आमदार निवडून आले. यावरून पुणेकर आपल्या बाजूने आहेत. त्यामुळे पदवीधर निवडणुकीचे मतदान झाले की आपल्याला बसावे लागेल.''

इंदापूरच्या द्राक्षांना बाजारात यायला महिनाभर होणार उशीर, कारण...

सत्तेचा गैरवापर करण्यास भाजप एक नंबर 
वॉर्ड रचनेबद्दल बोलताना पवार म्हणाले, "सत्तेचा गैरवापर करण्यात भाजप एक नंबरचा पक्ष आहे. मागील वेगळ्याच वार्डरचनेवरून हे समोर आले आहे. कशा पद्धतीने त्यांनी वॉर्ड रचना केली हे सगळ्याच माहिती आहे. यंदा असे होणार नाही. कारण मी आहे.'' 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy CM Ajit Pawar made statement regarding upcoming municipal elections