esakal | पुण्यात नवी ६ पोलिस ठाणी होणार; उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आज बैठक
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit_Pawar

राज्य सरकारने पुणे शहरालगतची 23 गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्यात नवी ६ पोलिस ठाणी होणार; उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आज बैठक

sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील

पुणे : पुणे शहराची वाढती हद्द आणि गुन्हेगारी यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस ठाण्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. ग्रामीण मधील काही भाग घेऊन व शहरातील पोलिस ठाण्याचे विभाजन करून नवे सहा पोलिस ठाणी निर्माण केली जाणार आहेत. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी (ता. 4) महत्त्वाची बैठक मुंबई येथे होणार आहे. ही पोलिस ठाणी 26 जानेवारी रोजी सुरू होण्याची शक्‍यता आहे.

गेमर्ससाठी खुशखबरी! २६ जानेवारीला येणार पब्जीचा देशी अवतार FAU-G​

पुणे शहरात सध्या पाच परिमंडळांमध्ये 30 पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरातील पोलिस ठाण्यांची संख्या वाढविण्याबाबत चर्चा सुरू होती. अखेर यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. पुणे ग्रामीण मधील लोणीकंद पोलिस ठाण्याचे विभाजन करून वाघोली पोलिस ठाणे निर्माण केले जाईल. लोणीकाळभोरचे विभाजन करून उरुळीकांचन आणि हवेली पोलिस ठाण्याचे विभाजन करून नांदेड सिटी पोलिस ठाणे नव्याने तयार केले जातील. हे नवे पोलिस ठाणे पुणे पोलिस आयुक्तालयाला जोडले जातील. तर लोणीकंद, उरुळीकांचन आणि हवेली हे ग्रामीणमध्येच असतील.

पुणेकरांनो, फक्त 66 शाळाच सोमवारपासून सुरू होणार!​

शहर हद्दीतील चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे विभाजन करून बाणेर पोलिस ठाणे, हडपसरचे विभाजन करून काळेपडळ पोलिस ठाणे आणि चंदननगरचे विभाजन करून खराडी पोलिस ठाणे नव्याने निर्मिती केले जाईल. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक आयोजित केली असून, त्यास गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस अधीक्षक (पुणे ग्रामीण) अभिनव देशमुख आदी उपस्थित राहणार आहेत.

योगदान शून्य, पण श्रेय घेण्यासाठी बॅनरबाजी; भामा-आसखेडवरून भाजप-राष्ट्रवादीत धुसफूस​

मनपा हद्दवाढीच्या पार्श्‍वभूमीवर महत्त्वाचा निर्णय
राज्य सरकारने पुणे शहरालगतची 23 गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिस ठाण्यांच्या हद्दीचा विचार करता यातील बराचसा भाग ग्रामीण पोलिसांकडे आहे. पण आता पुणे पोलिस आयुक्तालयात 6 पोलिस ठाण्यांची वाढ होणार असल्याने समाविष्ट गावातील नागरिकांच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

अस्तित्वातील पोलिस ठाणे - विभाजनाने निर्माण होणारे पोलिस ठाणे
लोणीकंद - वाघोली
लोणीकाळभोर - उरुळीकांचन
हवेली - नांदेड सिटी
चतुःश्रृंगी - बाणेर
हडपसर - काळेपडळ
चंदननगर - खराडी

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)