प्रतिकूल ठिकाणीही मिळणार पौष्टिक अन्न

अक्षता पवार - सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 January 2021

डीएफआरएल प्रयोगशाळा गेल्या कित्येक वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहे. दुर्गम आणि युद्धजन्य परिस्थितीत सीमेवर लढणाऱ्या जवानांना सुरक्षित अन्न मिळावे म्हणून आवश्यक संसोधन ही प्रयोगशाळा करते.

पुणे- देशाच्या संरक्षणासाठी जवानांना उंच बर्फाच्छदीत शिखरे, समुद्री बेटे, दलदली, वाळवंटासारख्या ठिकाणी उणे ३० अंश सेल्सिअस ते ५० अंश सेल्सिअस तापमानात काम करावे लागते. शत्रूविरूद्ध लढण्यासाठी जवानांनी तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे. यासाठी त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी पौष्टिक आहाराची गरज भासते. यावर उपाय म्हणून ‘डिफेन्स फूड रिसर्च लॅबॉरेटरी’ने (डीएफआरएल) तब्बल बारा महिने टिकू शकेल, अशा पॅकिंग बॅगची निर्मिती केली आहे. 

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या अंतर्गत येणारी डीएफआरएल प्रयोगशाळा गेल्या कित्येक वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहे. दुर्गम आणि युद्धजन्य परिस्थितीत सीमेवर लढणाऱ्या जवानांना सुरक्षित अन्न मिळावे म्हणून आवश्यक संसोधन ही प्रयोगशाळा करते. देशाच्या सीमांचा विचार करता, विविध भागांना अनुरुप, बदलत्या तापमानाला टिकणारे पौष्टिक अन्न साठवणुकीचे तंत्रज्ञान विकसित करण्यात या प्रयोगशाळेचा हातखंडा आहे.  

पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; शहर पोलिस दलातील तिघांना राष्ट्रपती पदक!​

डीएफआरएल अशी पुरवते सेवा
डीएफआरएल या प्रयोगशाळेच्या माध्यमातून ‘अन्न विज्ञान’ आणि तंत्रज्ञानाच्या विविध पैलूंवर संशोधन करण्यात येते. तसेच प्रतिकूल परिस्थितीमध्ये जवानांसाठी सोईस्कर पदार्थांचा विकास केला जातो. यामध्ये खाद्यपदार्थांचे संरक्षण, पौष्टिक आणि जैवरासायनिक मूल्यांकन, अन्न सुरक्षा, अन्न पॅकेजिंग अशा विविध गोष्टींवर भर दिला जातो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये अन्न संबंधित अडचणी निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाते. यासाठी देशातील विविध भागांमध्ये सीमेवर तैनात असलेल्या जवानांना पौष्टिक आहारासाठी सुरक्षित पर्याय उपलब्ध करून देण्याची सुविधा या प्रयोगशाळेतर्फे केली जाते.

राज्यातील शेतकरी आंदोलन ते सीमेवर भारत-चीन संघर्ष; वाचा एका क्लिकवर​

पुण्याचा महत्वपूर्ण सहभाग
पुण्यातील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हान्स टेक्नॉलॉजी (डीआयएटी) आणि मैसूर येथील डीएफआरएल या संशोधन संस्था परस्पर सहकार्याने अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञानातील पदव्युत्तर शिक्षण देतात. पुण्यातील संस्थेत सैद्धांतिक अभ्यासक्रम शिकवला जातो. तर, डीआरएफएलमध्ये संशोधन आणि प्रात्यक्षिके घेतली जातात. 

 जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना 'पद्मविभूषण' जाहीर!​ 

असे आहे संशोधन 
    विविध जीवाणू, विषाणू आणि सूक्ष्मजीवांपासून अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी बॅगेची निर्मिती
    सर्वप्रकारचे अन्न पदार्थ साठवण्यासाठी उपयोग
    तीन प्रावरणे असलेल्या या बॅगचा बाह्य आवरण ॲलूमिना ऑक्साईडच्या पॉलिस्टर फिल्मपासून तयार
    ई-कोलाई जिवाणूपासून संरक्षण करते
    विविध तापमानात अन्न पदार्थ सुरक्षित राहतात
    बारा महिने अन्न सुरक्षित ठेवणारी ही पहिलीच बॅग 
सैन्याच्या प्रयोगशाळेने विकसित केले साठवणूक आणि पॅकेजिंगचे तंत्रज्ञान 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DFRL Nutritious food will be available even in adverse places

Tags
टॉपिकस
Topic Tags: