Statutory Admission Breaches: EuroSchool Undri Defies Mandatory 25% RTE Allotment Grids
Sakal
पुणे : पुण्यातील उंड्री येथील नामांकित 'युरो स्कूल'ने शिक्षण विभागाच्या अधिकृत मंजुरीनंतरही एका ५ वर्षीय बालकाला मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE २५% राखीव कोटा) प्रवेश देण्यास नकार दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित बालकाच्या २८ वर्षीय मातेने शाळेविरुद्ध पुणे जिल्हाधिकारी, प्राथमिक शिक्षण संचालक, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी आणि पोलिसांकडे धाव घेत तातडीने हस्तक्षेप करण्याची व शाळेवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.