निराश शिक्षण सेवकांनी मुख्यमंत्र्यांना घातले साकडे; केली 'ही' मागणी

निराश शिक्षण सेवकांनी मुख्यमंत्र्यांना घातले साकडे; केली 'ही' मागणी

पुणे : "वर्षानुवर्ष प्रतीक्षा केल्यानंतर राज्य सरकारने शिक्षक भरती प्रक्रिया राबविली. त्यात गुणवत्तेनुसार नियुक्ती देखील झाली आणि शिक्षण सेवक म्हणून रुजू झालो आणि हातात केवळ सहा हजार रूपयांचे मानधन येत आहे. घरापासून कोसो दूर झालेली ही नवनियुक्ती आणि अत्यंत अल्प मानधनात आम्ही जगायचे कसे?, अशी कैफियत नवनियुक्त शिक्षण सेवक मांडत आहेत.

पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती आणि नियोजनबद्ध धावपळ; वाचा तुम्हाला माहिती नसलेल्या सुप्रिया सुळे

एखाद्या शाळेतील शिक्षक, सहाय्यक शिक्षक यांच्याएवढेच काम शिक्षण सेवकालाही असते. काम सारखे असले तरी पगारात मोठा फरक असल्याचे चित्र आहे. तब्बल दहा-बारा वर्षांपासून रखडलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला गेल्यावर्षी मंजूरी मिळाली. त्यानंतर प्रत्यक्ष भरती पक्रियेत उमेदवारांना मुलाखतीद्वारे आणि मुलाखतीशिवाय भरती असे दोन पर्याय दिले होते. यातील मुलाखतीशिवाय भरतीतून नवनियुक्त झालेल्या उमेदवारांना शिक्षण सेवक म्हणून केवळ सहा हजार रुपये मानधनावर नियुक्त केले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या या शिक्षण सेवकांनी 'समान काम समान वेतन' मागणी लावून धरली आहे.

एकीकडे काही शिक्षण सेवक महिन्याचे  मानधन तर दुसरीकडे काही तासांचे वेतन घेत आहेत. शिक्षण सेवक देखील शिक्षकाप्रमाणे कोरोना योद्धा म्हणून सर्वेक्षण, दारोदारी जाऊन कोरोनाविषयी जनजागृती करत आहे आणि तेही कोणतेही विमा कवच नसताना. मग समान वेतनाचा हक्क मिळायला हवा, अशी मागणी डी.टी.एड, बी.एड. स्टुडंन्ट असोसिएशनने केली आहे.

HappyBirthday:म्हणून, सुप्रिया सुळे बनल्या संसदरत्न

मानधन वाढीसाठी मुख्यमंत्र्यांकडे साकडे

"राज्य व केंद्र सरकारच्या कायद्यानुसार 'समान काम समान वेतन' ठरविले आहे. तसेच वेतन आयोगाने वेळोवेळी सर्व नोकरदारांच्या पगारामध्ये वाढ केली आहे. परंतु शिक्षण सेवकांच्या पगारात कोणत्याही स्वरूपाची वाढ झालेली नाही. त्यामुळे राज्य सरकारने शिक्षण सेवकाच्या पगारात नियमितपणे वाढ करावी, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे."
- संदीप कांबळे, उपाध्यक्ष, डी.टी.एड, बी.एड. स्टुडंन्ट असोसिएशन

म्हणतात :

"शिक्षक भरती प्रक्रियेतंर्गत मुलाखतीशिवाय आमची नियुक्ती झालेली आहे. गुणवत्तेच्या आधारे ही नियुक्ती करण्यात आले असून एखाद्या शिक्षका एवढे काम आम्ही करत आहोत. तरी देखील मानधनामध्ये प्रचंड तफावत आहे. त्यामुळे सरकारने शिक्षण सेवकांच्या मानधन वाढीच्या मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. तुटपुंज्या मानधनावर उदरनिर्वाह करणे अशक्य आहे."
- तात्याराव चव्हाण, शिक्षण सेवक

निवृत्तीनाथांच्या पादुका विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ

"राज्यातील शिक्षण सेवक कोरोनाच्या संकट काळात कोणतेही विमा संरक्षण नसताना  दिवसरात्र पोलिसांबरोबर चेक पोस्टवर उभे आहेत. त्यात ऑनलाईन कामे ,सर्वेक्षण, रेशन दुकान अशा विविध ठिकाणी आम्ही सेवा देत आहेत. महागाईच्या काळात अल्पशा मानधनामध्ये पिळवणूक होत आहे. या मानधनात घर चालवणे ही तारेवरची कसरत झाली आहे. कर्ज काढून कुटुंबाचा गाडा चालण्याची वेळ आली आहे."
- धनदिप तोडकर, शिक्षण सेवक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com