पूजेनंतर जाणार होते हनिमुनला; फ्रिजमध्ये सापडले 'ते' औषध अन्

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

लग्न झाल्यानंतर पूजेच्या दिवशी सुप्रिया फ्रीजमध्ये ठेवलेल्या काही वस्तू घेण्यासाठी गेली. त्यावेळी फ्रीजमध्ये असलेल्या काही औषधांविषयी तिच्या मनात शंका निर्माण झाली. त्यामुळे तिने ती औषधे तपासणीसाठी दिली

पुणे : आजार लपवून ठेवत लग्न केल्याचे अनेक प्रकार सध्या घडत आहेत. अदृश्‍य आजार लवकर लक्षात येत नसल्याने लग्नानंतर अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले आहे. असाच एका प्रकरणातून नर्सची सुटका झाली आहे. ती लग्नाच्या फसव्या बेडीत अडकली. मात्र एचआयव्हीसारख्या जीवघेण्या आजारातून बचावली आहे.

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा

लग्न झाल्यानंतर पूजेच्या दिवशी सुप्रिया फ्रीजमध्ये ठेवलेल्या काही वस्तू घेण्यासाठी गेली. त्यावेळी फ्रीजमध्ये असलेल्या काही औषधांविषयी तिच्या मनात शंका निर्माण झाली. त्यामुळे तिने ती औषधे तपासणीसाठी दिली. संबंधित औषधे ही एचआयव्ही झालेल्या रुग्णाचे असल्याचे तपासणीत उघड झाले. पतीने एचआयव्ही असल्याची बाब लपवून लग्न केल्याचे स्पष्ट झाल्याने तिला मोठा धक्का बसला. त्यामुळे तिने माहेर गाठले आणि पती अनुज (दोन्ही नावे बदललेली) याच्यापासून घटस्फोटासाठी अर्ज केला. समुपदेशनानंतर त्याने तिला घटस्फोट देण्याचे मान्य केले. त्यासह लग्नासाठी केलेला खर्च म्हणून पाच लाख रुपयेही सुप्रिया हिच्या कुटुंबीयांना दिले.

चालक हॅन्डब्रेक न लावताच बसमधून उतरला अन् उतरावरुन...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अनुज हा संगणक अभियंता म्हणून कार्यरत आहे. त्यांचे अरेंज मॅरेज आहे. पूजेच्या दिवशी फ्रीजमध्ये सापडलेल्या औषधांची तपासणी झाल्यानंतर तिने त्याला एचआयव्ही आहे का, अशी विचारणा त्याला केली. त्यास त्याने नकार दिला. त्यामुळे सुप्रियाने पतीकडे तपासणी करण्याची मागणी केली. त्यास मात्र त्याने विरोध केला. मात्र पत्नीच्या हट्टामुळे अखेर तो चाचणी करण्यास तयार झाला. दोघांचीही चाचणी करण्यात आली. त्यामध्ये अनुजला एचआयव्ही असल्याचे निष्पन्न झाले. घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर त्यांना समुपदेशनासाठी ऍड. अतुल गुंजाळ यांच्याकडे पाठविण्यात आले. त्यात त्याने लग्नापूर्वी एचआयव्ही असल्याचे मान्य केले नाही. वैद्यकीय अहवाल पाहून समुपदेशनानंतर काही कालावधीतच न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला.

...म्हणूून भोंदूबाबाने केला पाच बहिणीवर लैंगिक अत्याचार

पूजेनंतर जाणार होते हनिमुनला :
पूजा झाल्यानंतर सुप्रिया आणि अनुज हनिमुनला जाणार होते. मात्र औषधाचा संशय आल्यानंतर सुप्रिया माहेरी निघून गेली होती. त्यामुळे ते एकत्र आलेच नाही. त्यामुळे ती एचआयव्ही होण्यापासून बचावली. अन्यथा तिला देखील भविष्यात एचआयव्ही होण्याचा धोका होता.

सलूनमध्ये शिरुन दोघांवर केले ब्लेडने वार; दिली जिवे मारण्याची धमकी

लग्न जमविताना जन्मपत्रिका पाहिली जाते. मात्र, बदललेल्या परिस्थितीत आता पत्रिका पाहण्यापेक्षा दोघांच्या रक्ताची तपासणी करणे गरजेचे आहे. साथीदारात काही दोष असल्यास दोघांचे आयुष्य उद्‌ध्वस्त होण्याची शक्‍यता असते. सुप्रिया ही नर्स असल्याने तिला हा प्रकार लक्षात आला. तिने दाखविलेल्या हुशारीमुळे ती बचावली.
- अॅ्ड. अतुल गुंजाळ, समुपदेशक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disclosure of disease due to drugs hidden in the fridge by husband