कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांच्या संगोपनावर जिल्हा प्रशासनाची नजर

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना न्याय्य मिळवून देवून त्यांचे संगोपन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आली.
Dr Rajesh Deshmukh
Dr Rajesh DeshmukhSakal

पुणे - कोरोनामुळे (Corona) दोन्ही पालक (Parents) गमावलेल्या बालकांना न्याय्य (Justice) मिळवून देवून त्यांचे संगोपन (Care) करण्यासाठी आवश्यक उपाययोजना (Measures) करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr Rajesh Deshmukh) यांनी दिल्या आहेत. (District Administration Keeping Watch Care of Children Lost Parents Corona)

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत डॉ. देशमुख बोलत होते. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी परम आनंद यांच्यासह जिल्हास्तरीय कृती दलाचे सदस्य उपस्थित होते.

Dr Rajesh Deshmukh
मांजरी रेल्वे फाकट 18 जूनपासून बंद

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, कोरोनामुळे ज्या बालकांचे पालक दगावले आहेत, अशा बालकांना बाल संगोपन योजनेंतर्गत मदत मिळावी म्हणून कृतीदलाची (टास्क फोर्स) ची स्थापना करण्यात आली आहे. अशा बालकांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासोबतच कोरोनामुळे पालक गमावलेले अशा बालकांचा सांभाळ योग्यरितीने होतो किंवा नाही याबाबत खात्री करून घ्यावी, त्यासाठी गृहभेटी द्याव्यात.

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची माहिती समन्वयकांना उपलब्ध करुन देण्यात यावी. बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करावा.

चाईल्ड हेल्प लाईन क्रमांक 1098 चा माहिती फलक कार्यक्षेत्रातील सर्व रुग्णालयांत दर्शनी भागात लावण्यात येईल, याची दक्षता घ्यावी. यासोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बालगृहे, निरीक्षणगृहांसाठी तात्काळ उपचार पुरविण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात यावीत. बालकांची सर्वतोपरी काळजी घेण्यासोबतच त्यांचे आर्थिक व मालमत्ता विषयक हक्क अबाधित राहतील याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com