esakal | पुणे जिल्ह्यात तपासण्यांची संख्या वाढणार अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

corona test.jpg

रॅपिड अँटीजेन टेस्टची संख्या वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. त्या नुसार बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय, रुई ग्रामीण रुग्णालय तसेच तालुक्यातील जेथे जास्त रुग्ण मिळाले आहेत, तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येत्या दोन तीन दिवसात या तपासण्या सुरु केल्या जाणार आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.

पुणे जिल्ह्यात तपासण्यांची संख्या वाढणार अन्...

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : जिल्ह्यातील रॅपिड अँटीजेन टेस्टची संख्या वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. त्या नुसार बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय, रुई ग्रामीण रुग्णालय तसेच तालुक्यातील जेथे जास्त रुग्ण मिळाले आहेत, तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येत्या दोन तीन दिवसात या तपासण्या सुरु केल्या जाणार आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 
तपासण्यांची संख्या वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. नुकताच त्यांनी बारामती, इंदापूर व पुरंदर या तीन तालुक्यांचा दौरा केला. या दौ-यानंतर त्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीचे आकलन केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. या मुळे तपासणीचा वेग व संख्या दोन्हीमध्ये लक्षणीय वाढ होईल. 

वरसगाव ओव्हरफ्लो; खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग वाढवला

बेडसची संख्याही वाढवली जाणार...
बारामतीत तपासण्यांची संख्या वाढल्यानंतर रुग्णसंख्याही वाढेल, असे गृहीत धरुन स्थानिक प्रशासनाने बेडसची संख्याही वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या रुई येथे 30, सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात 72 तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 162 बेडसची सोय उपलब्ध आहे. माळेगाव येथील इंजिनिअरिंग कॉलेजच्या वसतिगृहात आज 100 बेडस तयार झालेले असून येथे 168 बेडसची क्षमता करण्यात येणार असल्याचे डॉ. खोमणे यांनी नमूद केले.

केंद्र सरकारच्या धोरणावर अजित पवारांचा सावध पवित्रा; सरसकट वाहतुकीबाबत वेगळा निर्णय घेणार?​

यात रुई व सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात ज्यांना लक्षणे आहेत असे रुग्ण तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व माळेगाव येथे ज्यांना लक्षणे नाहीत अशा रुग्णांची सोय केली जाणार आहे. दरम्यान बारामती हॉस्पिटल येथे गंभीर स्वरुपाच्या रुग्णांना दाखल केले जात आहे. आवश्यकतेनुसार क्षमता वाढविण्याचेही नियोजन प्रशासनाने केले आहे.