इंदापुरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या 'या' सूचना

sansar.jpg
sansar.jpg

वालचंदनगर (पुणे) : सणसर (ता. इंदापूर) येथील कन्टेंमेंट झोनला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट दिली. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी सूचना दिल्या. इंदापूर तालुक्यामध्ये या आठवड्यमध्ये कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढली असून कोरोना रुग्णाचा आकडा ४२३ वरती पोहचला आहे.

सणसर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात आतापर्यंत कोरोनाचे ४५  रुग्ण आढळले असून १९ रुग्णावर उपचार सुरु आहेत. तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पाश्‍ र्वभूमीवर जिल्हाधिकारी  डॉ. राजेश देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तालुक्यातील सणसर गावाला भेट देवून आढावा घेतला. सणसर परिसरातील काेरोनाग्रस्त रुग्णांना इतर आजार होते का ? त्यांना योग्य उपचार मिळाले का ? याची चौकशी केली तसेच भाग्यनगर परिसरामध्ये काेरोना आजारातून बऱ्या झालेल्यांशी चर्चा केली.  

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून काळजी घेण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या. तसेच जास्तीजास्त नागरिकांची तपासणी करुन लक्षणे जाणवणाऱ्या नागरिकांची तातडीने कोरोना टेस्ट करावी. इंदापूर तालुक्यातील आरेाग्य विभाग, महसूल व पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र समन्वयाने काम करुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे आवाहन केले.

सध्या सणसर परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण सुरु असून घरोघरी जावून नागरिकांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण, ताप तपासण्यात येत आहे. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार, इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी विजय परीट, तालुका आरोग्य अधिकारी सुरेखा पोळ, विस्तार अधिकारी किरण मोरे, विक्रम निंबाळकर, यशवंत पाटील, अभयसिंह निंबाळकर, सागर भोईटे विजय काळे,  दत्तात्रय गुप्ते, पोलिस पाटील राजेंद्र चव्हाण, ग्रामसेवक महादेव पोटफोडे, तलाठी बारवकर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com