Video : महापरीक्षा पोर्टलच्या सर्व परीक्षांची चौकशी करा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

पुणे : ''महापरीक्षा पोर्टलद्वारे भरती म्हणजे गुणवत्ता असलेल्या उमेदवारांवर अन्याय आहे. या माध्यमांतून प्रचंड गैरव्यवहार झाला आहे. या पोर्टलद्वारे झालेल्या सर्व परीक्षांची सीआयडी चौकशी करावी'', अशी मागणी परीक्षार्थींनी पत्रकार परिषदेत केली.

पुणे : ''महापरीक्षा पोर्टलद्वारे भरती म्हणजे गुणवत्ता असलेल्या उमेदवारांवर अन्याय आहे. या माध्यमांतून प्रचंड गैरव्यवहार झाला आहे. या पोर्टलद्वारे झालेल्या सर्व परीक्षांची सीआयडी चौकशी करावी'', अशी मागणी परीक्षार्थींनी पत्रकार परिषदेत केली.

राहुल कवठेकर म्हणाले, "गरीब, होतकरू विद्यार्थी डावलला जातो आहे. 18 ते 19 लाख भरून नोकरी दिली जाते. 12 जुलै रोजी बनावट परीक्षार्थी पकडला. या प्रकारांची सीआयडीमार्फत चौकशी करावी. आतापर्यंत पंधरा भरती परीक्षा या पोर्टलद्वारे झाल्या आहेत.

Video:पबजी खेळून डोकं फिरलं, घटनेपेक्षा तरुणाचं नाव जास्त चर्चेत! 
सचिन ढवळे यांनी सांगितले, मागील मुख्यमंत्र्यांनी का काहीच केले नाह? नवीन मुख्यमंत्र्यांनी कार्यवाही करावी. हिंजवडी येथील अलार्ड कॉलेजमधे सिस्टिम हँग झाली, भारती विद्यापीठात आज लाइट गेली. मग, परीक्षा पद्धतीवर कसा विश्वास ठेवायचा. पेपर प्रिंट करायचा नाही, तर तीनशे, पाचशे रुपये घेतात. विविध केंद्रांसाठी अर्ज भरले, तर त्याला वेगळे शुल्क भरावा लागतात. यवतमाळमधे जुलैमधे परीक्षा झाली तलाठ्याची. तेथे परीक्षा केंद्राच्या मालकाचा मुलगा पहिला आहे. हायटेक तंत्रज्ञान वापरून परीक्षा देतात. 72 हजार मेगाभरतीचे गाजर दाखवतात. पण संधी डावलले जाते. परीक्षा ऑनलाइन असेल, तर केंद्रात सीसीटीव्ही यंत्रणा का नाही. एमपीएससीने सर्व परीक्षा घ्यावी, ते एकाचवेळी पेपर घेतात. त्यामुळे पेपर फुटत नाही. आताची यंत्रणा, पद्धती सदोष असल्याने पेपर फुटला जातो. हे परीक्षा पद्धत बंद केली नाही, तर आम्ही परीक्षेवर बहिष्कार टाकू, दलालांचे फोन येतात. एका पदासाठी एकाचवेळी परीक्षा झाली पाहिजे,'' असे ढवळे म्हणाले.

धक्कादायक! राहत्या घरात आढळला मुलीचा मृतदेह, कारण अद्याप अस्पष्ट

निलेश निंबाळकर म्हणाले, "महापरीक्षा पोर्टलमुळे मास कॉपी होते आहे. रेल्वे, आयपीबीएस या आस्थापना देखील ऑनलाइन परीक्षा घेतात, त्याही अनेक प्रश्नपत्रिका काढतात, त्यांच्या पद्धतीत का घोळ होत नाही? एमपीएससीकडून या परीक्षा घेता येत नसतील, भरतीसाठी वैधानिक  आयोग स्थापन करावा."

#PmcIssue ताडपत्रीखाली काय लपविले आहे सुतार दवाखान्यात

पद्माकर होळंबे म्हणाले, "भरतीचे गाजर दाखविले जाते. काही जागांची भरती होते. पण गरजूंना तिथे स्थान मिळत नाही. परीक्षार्थींनीच हे पोर्टल नको आहे, तर सरकारला का हवे आहे. यातून तरुणांचे वय निघून चालले आहे. त्यामुळे परीक्षा पोर्टल रद्द करावे अन्यथा आक्रमक पाऊल उचलावे लागेल.

फुगेवाडी दुर्घटनेत ठेकेदाराचा निष्काळजीपणाच; अप्पर तहसीलदार कार्यालयाचा ठपका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do Inquiry of all exams of Maha Portal