esakal | पुणेकर एेकलंत का ! इच्छेप्रमाणे दान द्या अन् गणेश मूर्ती घेऊन जा ! 
sakal

बोलून बातमी शोधा

ganpati bappa.jpg


कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर औंधमधील युवकाने राबविला अनोखा उपक्रम 

पुणेकर एेकलंत का ! इच्छेप्रमाणे दान द्या अन् गणेश मूर्ती घेऊन जा ! 

sakal_logo
By
बाबा तारे

औंध (पुणे) : लॉकडाउनमुळे सर्वच सणांवर मर्यादा आल्या असून, अनेकांना रोजगार नसल्याने अनेक वंचित कुटुंबांना गणेशोत्सव साजरा करणेही अवघड झाले आहे, अशा परिस्थितीत प्रत्येकाला गणेशमूर्ती घरी नेता यावी, यासाठी औंधमधील एका युवकाने अभिनव उपक्रम राबवला आहे. "आपल्या इच्छेप्रमाणे दान देऊन मूर्ती घेऊन जावी,' अशा या विधायक उपक्रमाला परिसरातील गणेश भक्तांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. 

'आरटीई'च्या राखीव जागांवरील प्रवेशासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत    

औंधमधील विधाते वस्ती येथील समीर विधाते हे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबवीत आहे. यावर्षी लॉकडाउनमुळे सर्वांचेच आर्थिक गणित बिघडल्याने मूर्ती बनवणारे कारागीर आपापल्या गावी परतल्याने मूर्ती बनवण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत असून, पर्यायाने सर्व प्रकारच्या मूर्तींच्या किमतीतही वाढ झाली आहे. या सर्वांचा विचार करुन समीर विधाते यांनी औंध येथे स्टॉल उभारून "हवी ती मूर्ती घेऊन जा व इच्छेप्रमाणे दान करा' असा उपक्रम राबवला आहे.

येवा वाढल्याने खडकवासला धरणातील विसर्गात वाढ

मूर्ती स्टॉलच्या बाजूलाच दान पेटी ठेवली असून आपल्या इच्छेप्रमाणे पेटीत दान टाकून गणेशभक्त या मूर्ती आपल्या घरी घेऊन जात आहेत. स्वखर्चातून उभारलेल्या या स्टॉलमधून येणारे उत्पन्न कोरोना योद्‌ध्यांचा सन्मान करण्यासह त्यांना लागणारी सुरक्षेची साधने उपलब्ध करुन देण्यासाठी वापरले जाणार असून, संकटकाळी समाजहिताच्या दृष्टीने असा उपक्रम राबविल्याचे विधाते यांनी या वेळी सांगितले. 

loading image
go to top