महाविद्यालय सुरु करण्याच्या नादात रुग्णांचे हाल करू नका : डॉ. अमोल कोल्हे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याच्या नादात रुग्णांचे हाल करू नका. महापालिका रुग्णालयातील रुग्णाना शासकीय योजनांची देण्यात यावी, अशा शब्दात शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज (ता.25) महापालिकेच्या वायसीएमच्या डॉक्टरांची कानउघडणी केली.

पिंपरी : पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याच्या नादात रुग्णांचे हाल करू नका. महापालिका रुग्णालयातील रुग्णाना शासकीय योजनांची देण्यात यावी, अशा शब्दात शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज (ता.25) महापालिकेच्या वायसीएमच्या डॉक्टरांची कानउघडणी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 संत तुकाराम नगर येथील महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाला त्यांनी सकाळी दहा वाजता अचानक भेट दिली.   अचानक आल्यामुळे सगळेच गोंधळून गेले होते. त्यांनाही प्रत्येक विभागाची पाहणी करून वायसीएमच्या कारभाराची माहिती घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते योगेश बहल, नगर सेवक  दत्ता साने, शाम लांडे, वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, उपअधीक्षक डॉ. शंकर जाधव उपस्थित होते.

दिल्लीतील शाळांना मेलेनिया ट्रम्प यांनी दिली भेट; म्हणाल्या...

खासदार डॉ. कोल्हे यांनी वायसीएमच्या कामकाजाचा संपूर्ण आढावा घेतला आहे. त्यांनी रुग्णाला आयुषमान भारत, महात्मा फुले आरोग्य या शासकीय योजनांची माहिती देण्यात यावी अशी सूचना केली आहे. तक्रारी, नागरिकांच्या समस्यांबाबत अधिका-यांशी चर्चा केली आहे. प्रशासन, डॉक्टरांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत. दोन महिन्यानंतर पुन्हा याचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. ते म्हणाले, परगावातील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा शेडची व्यवस्था करण्यात यावी.

डोनाल्ड ट्रम्प ज्या पक्षाचे त्या पक्षाचा 'हा' मराठी माणूस आहे अध्यक्ष

दरम्यान, कोल्हे यांनी आयसीयू विभागाची पाहणी केली.  रुग्णांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. पुरेसे औषध आहेत का? योग्य उपचार मिळतात का ? डॉक्टर वेळेवेर येतात का? याची विचारपूस केली. उपकरणांची झालेली खरेदी, असलेली प्रस्तावित खरेदी आणि त्यानंतर त्याचा होणारा वापर याचा संपूर्ण अहवाल देखील त्यांनी मागविला आहे. 

साप आणि रेबीज लस आहे? 
सापाचा दंश झाल्यावर आणि कुत्र्यांनी चावा घेतल्यावर वायसीएममध्ये लस उपलब्ध आहे का? याविषयी त्यांनी आवर्जून माहिती घेत लस उपलब्ध करण्याच्या सूचना केल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dont Ignore patients name of starting college says Dr Amol Kolhe