esakal | 'नोंदणी व मुद्रांक शुल्क'चे ई-सर्च जोमात; दररोज भेट देणाऱ्यांच्या संख्येत दुपटीने वाढ 
sakal

बोलून बातमी शोधा

esearch.jpg

लॉकडाउन आणि त्यांच्या नंतरच्या काळातही अनेक दस्त रजिस्टर कार्यालय बंद आहेत. परंतु नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने उपलब्ध करून दिलेल्या ई-सर्च सुविधेचा या काळात मोठा फायदा झाला.

'नोंदणी व मुद्रांक शुल्क'चे ई-सर्च जोमात; दररोज भेट देणाऱ्यांच्या संख्येत दुपटीने वाढ 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : "लॉकडाउन आणि त्यांच्या नंतरच्या काळातही अनेक दस्त रजिस्टर कार्यालय बंद आहेत. परंतु नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने उपलब्ध करून दिलेल्या ई-सर्च सुविधेचा या काळात मोठा फायदा झाला. त्यामुळे क्‍लायंटची कामे मार्गी लावण्यात फार काही अडथळा आला नाही,' असे अॅड विक्रम वैद्य सांगत होते.

 Video : रामभक्तांसाठी आनंदाची बातमी; रामाची चलनी नोट आहे पुण्यात!
जमिन, सदनिका अथवा दुकाने आदींचे जुने दस्ताऐवज शोधण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाने "ई सर्च' ही संगणक प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषत: कोरोनाच्या काळात या प्रणालीचा वापर वकिल आणि नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर केला असल्याचे समोर आले आहे. एरवी दररोज 20 ते 25 हजार नागरिक या प्रणालीचा वापर करत होते. आता ही संख्या जवळपास या कळात दुपटीने वाढली आहे. दररोज चाळीस हजाराहून अधिक वकिल आणि नागरिक या प्रणालीचा वापर करत असल्याचे समोर आले आहे.

 ज्येष्ठांना हवीत सुविधासंपन्न जीवनशैलीची घरे
नोंदणी व मुद्रांक विभागाने दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदणी झाल्यावरच लगेच ते ई सर्च प्रणालीमध्ये अपलोड केले जात आहे. रियल टाईममध्ये ई सर्च वर दस्ताऐवज उपलब्ध होत असल्याने नागरिकांना संबधित मालमत्तेचा मालक कोण आहे, संबधित मालमत्तेचा व्यवहार कधी झाला याची माहिती तात्काळ घरबसल्या मिळत आहे. देशात पहिल्यांदाच रियल टाईममध्ये दस्ताऐवज ऑनलाईन उपलब्ध करण्याचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे.

 
'आरटीई'च्या राखीव जागांवरील प्रवेशासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत    

नोंदणी व मुद्रांक विभाग नागरिकांना अधिकाधिक सुविधा ऑनलाईन पध्दतीने देण्यात अग्रेसर आहे. याचाच एक भाग म्हणून खरेदी-विक्री व्यवहाराचे जुने दस्त ऑनलाईन पाहण्याची सुविधा नोंदणी व मुद्रांक्र विभागाच्या esearchigr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. याच्याच पुढच्या टप्प्यात नोंदणी झालेले दस्त लगेचच ई सर्चमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले जात आहे. एकाच जागेची किंवा सदनिकांची विक्री अनेकांना करण्याचे प्रकार उघडकीस आले आहे. यामध्ये खरेदीदाराची आर्थिक फसवणूक होते. तसेच एक सदनिका अनेक बॅंकेत गहाण ठेवून त्याआधारे कर्ज घेतल्याचे प्रकारही घडतात.

कोरोनाची परिस्थिती आटोक्‍यात येईल :  डॉ. राजेश देशमुख

दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी झालेले दस्त लगेच ई सर्च मिळत असल्याने मालमत्तेचा मालक कोण, खरेदी - विक्री व्यवहार कधी झाला याची माहिती नागरिकांना मिळत आहे. ई सर्चवर जमिनीच्या सर्व्हेनंबर अथवा गटनंबरनुसार त्याचबरोबर प्रॉपर्टी कार्डच्या नंबरनुसारही मालमत्तेची माहिती मिळत आहे. 'ई सर्च' मध्ये 2002 ते आजपर्यंतचे दस्त उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सुविधेमुळे नागरिकांना घरबसल्या दस्त पाहता येतात. ई सर्च या सुविधेचा वापर करून शोधलेल्या दस्ताची अथवा दस्तांच्या सूचीची (इंडेक्‍स) प्रत डाऊनलोडही करता येते. लॉकडाउनमुळे दुय्यम निबंधक कार्यालये बंद होती. त्यामुळे या सुविधेचे महत्त्व दिसून आले आहे. 

येवा वाढल्याने खडकवासला धरणातील विसर्गात वाढ

ई सर्च सुविधेचे फायदे 

  • दस्त क्रमांकानुसार अथवा मिळकतक्रमांकानुसार शोधण्याची सुविधा 
  • दस्त शोधण्यासाठी इतर कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही 
  • प्रत डाऊनलोड करण्याची सुविधा 


कोथरूड येथे एक जुनी सदनिका आम्ही विकत घेण्याचा निर्णय घेतला होता. थोडे पैसेही दिले होते. परंतु व्यवहार होण्याआधीच लॉकडाउन लागू झाले. त्यामुळे आता काय होणार याचे टेशंन आले होते. परंतु ऑनलाईन ई-सर्चचा उपयोग करून वकिलांनी सर्व माहिती दिली. आता व्यवहारही झाला. 
-संजय मेमाणे, ग्राहक 

loading image
go to top