हटके छंद ! डॉक्टराचं इंजिनियर डोकं, टाकाऊ वस्तूंपासून बनविली भन्नाट घड्याळं

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 January 2021

हाडांचे डॉक्‍टर असलेले डॉ. ताकवले यांनी गाड्यांचे वेगवेगळे स्क्रॅप पार्टस जसे की स्टिअरिंग व्हील , कारचा जॅक, वेगवेगळे स्पॅनर, क्‍लच प्लेट, प्रेशर प्लेट, चाकाचे ड्रम, सायकल व दुचाकीचे चैन सॉकेट व इतर अनेक भंगारातील लोखंडी वस्तूंपासून वेगवेगळी भिंतीवरील घड्याळे बनविली आहेत. ते म्हणतात,""चार वर्षांपूर्वी मी पहिले घड्याळ बनविले.

पुणे : एक डॉक्‍टर म्हणून माझ्यासाठी रुग्णसेवा सर्वतोपरी आहे. रोजच्या गदगदीत बऱ्याचदा उत्साह कमी होतो. अशा वेळी भंगारातील वस्तूंपासून भिंतीवरील घड्याळे बनविण्याचा छंद मला सकारात्मक ऊर्जा देतो. तिचा वापर माझ्या कामासाठी होतो आणि रोजचे काम करण्यालाही एक वेगळीच मजा येते, अशी प्रतिक्रिया डॉ. सुधांशु ताकवले यांनी दिली. 

हाडांचे डॉक्‍टर असलेले डॉ. ताकवले यांनी गाड्यांचे वेगवेगळे स्क्रॅप पार्टस जसे की स्टिअरिंग व्हील , कारचा जॅक, वेगवेगळे स्पॅनर, क्‍लच प्लेट, प्रेशर प्लेट, चाकाचे ड्रम, सायकल व दुचाकीचे चैन सॉकेट व इतर अनेक भंगारातील लोखंडी वस्तूंपासून वेगवेगळी भिंतीवरील घड्याळे बनविली आहेत. ते म्हणतात,""चार वर्षांपूर्वी मी पहिले घड्याळ बनविले. त्यानंतर एकदम गेल्या दोन महिन्यापूर्वी अजून एक घड्याळ करण्याची इच्छा झाली व विविध प्रकारची 30 पेक्षा जास्त घड्याळे मी दोन महिन्यात बनविली आहेत. 

यंदाचा प्रजासत्ताक दिन परदेशी पाहुण्यांशिवाय; ५५ वर्षानंतर घडतोय नवा इतिहास!​

अख्खं गावच करावं लागलं सील; हिमाचल प्रदेशात सर्वात मोठी कारवाई​

रोजचे पेशंट संपल्यानंतर क्‍लिनिक मध्ये व घरी रात्री माझी लहान मुले झोपल्यानंतर हे काम मी करत होतो.'' भंगार गोळा करणे, तो स्वच्छ करणे आणि त्यातून आकर्षक घड्याळ साकारण्यासाठी त्याना पत्नी डॉ. पुनम, मुलगा विहान, सहाय्यक किशोर कोंढाळकर, संकेत धुमाळ आदींनी मदत केली. 

छंद जोपासण्यासाठी "डॉक्‍टरां'चा सल्ला ः 
- छंद किंवा खेळामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते 
- रोजच्या एकसुरी कामात नाविण्यता येते, नवीन कल्पनांना वाव मिळतो 
- तो जोपासण्यासाठी वेळ काढणे आवश्‍यक आहे. 
- दिवसभरातील नियोजन करून छंदासाठी वेळ निश्‍चित करावा. 
- छंदात नाविण्यता आणण्याचा नेहमी प्रयत्न करा 

Pune Gram Panchayat Election Live Updates : तिसऱ्या टप्प्यातही भोर आघाडीवर; 60.41% मतदान​

कार रेसर असलेल्या संजय टकले यांना भेट म्हणून मी स्वतः तयार केलेले भींतीवरचे घड्याळ दिले. त्यांनाही ते आवडले. त्यानंतर माझ्या भावानेही एक मागितले. तेंव्हापासून सातत्याने मी भंगारातून घड्याळे बनवत आहे. त्यातून एक वेगळेच समाधान मिळते. 
- डॉ. सुधांशु ताकवले 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Sudhanshu Takwale makes attractive watches from waste materials Pune