....म्हणून डीएसकेंची चार महागडी वाहने लिलावातून वगळली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

स्थगिती दिलेल्या वाहनांमध्ये दोन बीएमडब्ल्यू, एक पोर्शे आणि टोयोटा कंपनीच्या एका वाहनाचा समावेश आहे. या वाहनांच्या नोंदणीबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) चौकशी करून त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत

पुणे, : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांची चार महागडी वाहने तूर्तास लिलावातून वगळण्यात यावी, असा आदेश बुधवारी न्यायालयाने दिला आहे. शनिवारी (ता. 15) या वाहनांचा लिलाव होणार होता.

पिंपरी : गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून चोरट्यांनी लुटले 12 लाख 84 हजार

स्थगिती दिलेल्या वाहनांमध्ये दोन बीएमडब्ल्यू, एक पोर्शे आणि टोयोटा कंपनीच्या एका वाहनाचा समावेश आहे. या वाहनांच्या नोंदणीबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) चौकशी करून त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. लिलाव करण्यात येत असलेली तेरापैकी आठ वाहने ही डीएसके मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड या दोन कंपन्यांच्या मालकीची आहेत. त्यामुळे ती विकण्यात येऊ नये असा, अर्ज बचाव पक्षाकडून तीन फेब्रुवारी विशेष न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात केला होता. त्यावर युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने चार वाहने लिलावातून वगळली आहे.

कोरोनामुळे चीनच्या गाेंजाऊचे आर्थिक व्यवहार थंडावले; भारतीय उद्योजक चिंतेत

लिलाव करण्यात येत असलेली काही वाहने डीएसके यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्या मालकीची आहेत, असे यापूर्वी न्यायालयाने दिलेल्या आदेशात नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात त्यातील आठ वाहने डीएसके मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड या दोन कंपन्यांच्या मालकीची आहेत. त्यांचा लिलाव करण्याचा अधिकार आत्ता सुनावणी सुरू असलेल्या न्यायालयास नाही तर राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाला आहेत. त्यामुळे हा लिलाव रद्द करावा किंवा संबंधित आठ गाड्या वगळून लिलाव करावा, अशी मागणी करणारा अर्ज शिरीष कुलकर्णी यांचे वकील प्रतीक राजोपाध्ये आणि आशिष पाटणकर यांनी न्यायालयात केला होता.

तरुणीला एमबीबीएसला अॅडमिशन देतो म्हणाला अन् 
 

डीएसके व त्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केलेल्या 20 वाहनांपैकी 13 वाहनांचा लिलाव करण्याची करण्याची परवानगी यापूर्वी न्यायालयाने दिली आहे. या वाहनांची किंमत दोन कोटी 57 लाख 50 हजार रुपये आहे. डीएसकेंकडे बीएमडब्ल्यू, पोर्शे, टोयाटो कॅमरी, एमव्ही ऑगस्टा यांसारख्या कोट्यवधी रुपयांच्या आलिशान गाड्या होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DSCs four expensive vehicles dropped out of the auction