esakal | गुरूपौर्णिमेला विधायक स्वरुप; कोरोना योद्ध्यांच्या हस्ते झाली मंदिरात आरती!
sakal

बोलून बातमी शोधा

Guru_Purnima

गुरूपौर्णिमेनिमित्त शहरातील दत्त मंदिर, साईबाबा मंदिर, विविध ठिकाणच्या मठाभोवती काही प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच ठिकठिकाणी मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट केली होती.

गुरूपौर्णिमेला विधायक स्वरुप; कोरोना योद्ध्यांच्या हस्ते झाली मंदिरात आरती!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होणारी गुरु पौर्णिमा यंदा मात्र कोरोनामुळे साधेपणाने आणि विधायक पद्धतीने साजरी झाली. शहरातील मंदिरे बंद असल्याने भाविकांनी रस्त्यावर उभे राहुन सामाजिक अंतर ठेवत दर्शन घेण्यावर भर दिला. याबरोबरच गुरु पौर्णिमेचे औचित्य साधत कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका व सफाई कर्मचाऱ्याच्या हस्ते आरती करुन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

- पोलिसांची ग्रामीण भागातही धडक कारवाई; विना मास्क फिरणाऱ्यांना ठोठावला दंड

गुरूपौर्णिमेनिमित्त शहरातील दत्त मंदिर, साईबाबा मंदिर, विविध ठिकाणच्या मठाभोवती काही प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच ठिकठिकाणी मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट केली होती. रविवारी पहाटेपासूनच गुरूप्रतिमा, पादुकांचे पूजन, आरती, दत्तयाग असे धार्मिक विधी करण्यात आले. दरवर्षी होणारी भजन, गुरूचे महत्त्व सांगणारी प्रवचने, व्याख्याने असे कार्यक्रम मात्र यंदा होऊ शकले नाहित. 

- विद्येच्या माहेरघरात घडला धक्कादायक प्रकार; पाचवीच्या अॅडमिशनसाठी मागितले अडीच लाख!

बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरामध्ये श्री दत्त मूर्तीसह संपूर्ण गाभाऱ्याला फुलांची आकर्षक आरास करण्यात आली. तसेच मंदिराच्या बाह्य भागात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सकाळी लघुरुद्र, दत्तयाग घेण्यात आला भाविकांनी रस्त्यावर उभे राहुन एलईडी स्क्रीनद्वारे दर्शन घेतले. दरम्यान, ट्रस्टने एकलव्य, आपले घर, बचपन वर्ल्ड फोरम, माहेर व संतुलन पाषाण या संस्थाना धान्य व वह्या वाटप करण्यात आल्या. तसेच ससूनचे डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी अध्यक्ष शिवराज कदम, उत्सव प्रमुख शिरीष मोहिते आदी उपस्थित होते.

लॉकडाऊनमधील लग्नाचा नवीन ट्रेंड; नवरा-नवरीला मिळतोय मॅचिंग मास्क

शहरातील शाळांच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने हा दिवस साजरा करण्यात आला. शिवाजीनगर येथील भारत इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी शिक्षिका आशा डिंबळे यांनी गुरूपौर्णिमेचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. शाळेतील यशराज काळे, पल्लवी मंजुळकर, ऋतुजा घाटपांडे या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. प्रशालेच्या प्राचार्या कल्पना साळुंके या नाविन्यापूर्ण उपक्रमाचे कौतुक केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एरवी मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेणाऱ्या भाविकांनी घरोघरी पूजन करून गुरूपौर्णिमा साजरी केली. काहीची आजची सकाळही आई-वडील यांच्या पूजनाने झाली. तर अनेकांनी आपल्या आयुष्यातील गुरूजनांप्रतीचे भाव व्यक्त करणारे व्हिडिओ, छोट्या फिल्म तयार करून त्या सोशल मीडियाद्वारे सर्वांना पाहण्यासाठी खुल्या केल्या. अशा पद्धतीने आज घराघरात गुरूपौर्णिमा साजरी झाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

loading image