Pune Accident News: सकाळच्या सुमारास नवले पुल परिसरात दोन वेगवेगळ्या अपघातात एकाचा मृत्यू तर ६ जण जखमी

Pune Accident News: बंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ एका डंपरने ट्रॅव्हल्सला जोराची धडक दिली. त्यामध्ये डंपरचालकासह ट्रॅव्हल्समधील ६ प्रवासी आणि डंपर चालक जखमी झाले आहेत.
Pune Accident News
Pune Accident NewsEsakal

मुंबई - पुण्यात वारंवार अपघात होणाऱ्या नवले पुलाजवळ डंपरने ट्रॅव्हल्सला जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. बंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ एका डंपरने ट्रॅव्हल्सला जोराची धडक दिली. त्यामध्ये डंपरचालकासह ट्रॅव्हल्समधील ६ प्रवासी आणि डंपर चालक जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी 7 वाजता झाला आहे.

वडगाव पुलाजवळ मुंबई बंगळुरू महामार्गावर ट्रॅव्हल्स आणि डंपरचा भीषण अपघात. मुंबईकडून सातारच्या दिशेने जाताना हा अपघात झाला असून डंपरने वडगाव पुलाजवळ असणाऱ्या व्ही आर एल ट्रॅव्हलच्या उभ्या असणाऱ्या ट्रॅव्हलला मागच्या बाजूने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.

Pune Accident News
Nashik Traffic Problem : स्पीड गनची वसुली जोरात, मात्र वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष; जिल्हा वाहतूक शाखेचे दुर्लक्ष

अपघात सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झाला असून जीवित हानी झाली नाही. सहा जखमी झाले असून त्यांना जवळील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी सिंहगड रस्ता वाहतूक पोलिस, सिंहगड रस्ता पोलिस दाखल झाले असून वाहने रस्त्याच्या मधून क्रेनच्या साह्याने बाजूला घेण्यात आली आहे. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलिस करत आहे.

Pune Accident News
Dharashiv : टॅंकरच्या धडकेत विद्यार्थिनी ठार ; मैत्रीण गंभीर, येणेगूरला संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखला

कचरा वेचक इसमाचा अज्ञात वाहनाकडून अपघात, अपघातात कचरा वेचकाचा जागीच मृत्यू

धायरी: मुंबई बंगळूर महामार्गावर पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास कचरा वेचक अज्ञात इसमाचा वडगाव पुलावर अज्ञात वाहनाकडून अपघात झाला असून ,कचरा वेचक अज्ञात इसमाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या  मार्गावर झाला असून, कुठल्या वाहनाने अपघात केला आहे अद्याप समजू शकले नसल्याचे सिंहगड रस्ता पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली आहे. पुढील वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com