'क्युआर कोड'द्वारे 2 हजार 400 जणांना मिळाली डिजीटल पास

During Lockdown 2 thousand 400 people received digital pass by QR Code.jpg
During Lockdown 2 thousand 400 people received digital pass by QR Code.jpg

पुणे : संचारबंदीच्या काळात महत्वाच्या कामाबाबत नागरिकांची गैरसोय होऊ नये, पुणे पोलिसांनी वेगवेगळ्या महत्वाच्या कारणासाठी सुरु केलेल्या डिजीटल पास/ डिजीटल परवानगीच्या सेवेला 24 तासात तब्बल 33 हजार 234 जणांनी प्रतिसाद दिला. त्यापैकी 2 हजार 403 जणांना पोलिसांनी 'क्युआर कोड'द्वारे परवानगी दिली. तर अनेकांनी किराणा, भाजीपाला, दूध आणण्यासाठीही परवानगी मागितली होती, मात्र त्यासाठी परवानगीची गरज नसल्याने ते अर्ज बाद करण्यात आले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शहरामध्ये सोमवारपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर वेगवेगळ्या महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडणार्या नागरीकांना पोलिसांकडुन होणारा त्रास लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने व्हॉट्सअप सेवा उपलब्ध करुन दिली होती. त्यालाही नागरीकांनी चांगला प्रतिसाद दिला होता, त्याद्वारे अनेक नागरीकांच्या समस्या सोडविन्यात आल्या होत्या.

दरम्यान, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलिसांनी आणखी एक महत्वाचे पाऊल टाकले आहे. पुणे पोलिसांनी वेगवेगळ्या महत्वाच्या कारणासाठी घराबाहेर पडणाऱया नागरिकांसाठी शुक्रवारपासून डिजीटल पास/परवानगीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यानुसार, नागरिकांनी डिजिटल पास/परवानगी मिळवण्यासाठी www.punepolice.in वर आपली तपशील माहिती कळविण्यास सांगितले होते. संबंधित अर्ज मंजूर झाल्यानंतर पोलिस नागरीकास क्यूआर कोड (QR Code) असलेला एक एसएमएस पाठविला जाणार होता. त्यानुसार, घराबाहेर पडल्यानंतर पोलिसांनी अडवल्यास हा एसएमएस त्यांना दाखवायचा होता,  संबंधित पोलिस अधिकारी/कर्मचारी त्यांच्याकडील मोबाईल एॅपमध्ये क्युआर कोडची तपासणी केल्यानंतर नागरिकांना त्यांच्या कामांसाठी पुढे जाता येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

Coronavirus : निर्जन रस्त्यावर माणुसकीचे दर्शन

दरम्यान, डिजीटल पास/ डिजीटल परवानगीच्या सेवेला शुक्रवारी दुपारी 4.30 वाजता सुरुवात झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी 4.30 पर्यंत तब्बल 33 हजार 234 जणांनी प्रतिसाद दिला. त्यापैकी 2 हजार 403 जणांना पोलिसांनी 'क्युआर कोड'द्वारे परवानगी दिली. तर 1097 जणाचे अर्ज नामंजूर करण्यात आले.अशी माहिती पोलिस उपायुक्त (गुन्हे) बच्चन सिंग यांनी दिली.
Coronavirus : मजुर कुटंबासह निघाले आपल्या मूळ गावी पायी चालत

डिजिटल पास/परवानगी मिळवण्यासाठी
इथे भरा माहिती :
* www.punepolice.in 
* अर्ज मंजूर झाल्यास आपणास मिळेल एक क्यूआर कोड (QR Code) 
* या क्युआर कोडचा एक एसएमएस तुमच्या मोबाईलवर येईल.
* पोलिसांनी अडवल्यास हा एसएमएस/क्युआर कोड दाखवा

Coronavirus : सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांकडे दुर्लक्ष झाल्यास घात

यासाठी परवानगीची गरज नाही

पोलिसांनी परवानगी दिलेल्या घटकांसह किराणा माल, भाजीपाला, दूध यांसारख्या वस्तु आणन्यासाठी पायी जाणार्या नागरीकांना परवानगीची गरज नाही.

"डिजिटल परवानगी/ पास ही सेवा फक्त नागरीकांना त्यांच्या महत्वाच्या कामात अडथला येऊ नये यासाठी दिली आहे.जीवनावश्यक वस्तु आणन्यासाठी पायी जाणार्याना परवानगीची गरज नाही. नागरिकांनी महत्वाची कामे असतील तरच डिजिटल परवानगीसाठी अर्ज करावा."
- बच्चन सिंग, पोलिस उपायुक्त (गुन्हे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com