पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे वीजयंत्रणेला फटका

पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे वीजयंत्रणेला फटका

पुणे - पुणे व पिंपरी चिंचवड शहरात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाच्या तडाख्यात सुमारे 310 रोहित्रांवरील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे शहराच्या बहुतांश भाग काल रात्रीपासून अंधारात बुडाला होता. तर काहीं भागात खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. यातील सुमारे 95 टक्के रोहित्रांवरील वीजपुरवठा महावितरणकडून सायंकाळी पर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, काही भागात व सोसायट्यांमध्ये अद्यापही पावसाचे पाणी साचलेले असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून संबंधीत रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. काल पावसाचा जोर ओसरल्यानंतर लगेचच वीजपुरवठा सुरळीत करण्याचे कामे सुरु झाले. यात रात्रीपासून ते सकाळी उशिरापर्यंत महावितरणचे अभियंते व जनमित्रांनी दुरुस्तीचे कामे करून बहुतांश वीजपुरवठा सुरळीत केला असल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला. 

मुसळधार पावसाच्या तडाख्यामुळे धानोरी, नगररोड, लोहगाव, वडगाव शेरी, विमाननगर, कोंढवा, रास्तापेठ, वानवडी, फातिमानगर, मंगळवार पेठ, एनआयबीएम रोड, वारजेचा काही भाग, सिंहगड रोड, धायरी, शिवणे, धायरी, मार्केटयार्ड, बिबवेवाडी, आंबेगाव, कात्रज, सहकारनगर, पर्वती, पेशवेप्लॅट, स्वारगेट, हडपसर, हांडेवाडी, पिसोळी, पंचवटी, पाषाण, खराळवाडी, पिंपळे सौदागर, जुनी सांगवी, ताथवडे, पिंपळे सौदागर, देहू रोड, चऱ्होली, रावेत, चिखली, थेरगाव, दापोडी, हिंजवडी आदी परिसरात झाडे व मोठ्या फांद्या वीजयंत्रणेवर पडल्याने तसेच पावसाचे पाणी साचल्याने वीजयंत्रणेत बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित झाला होता. तर काही भागात खबरदारीचा उपाय म्हणून अनेक सोसायट्यांमध्ये तसेच फिडर पिलरमध्ये पाणी साचल्याने रोहित्रांवरून वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला. या सर्व भागातील बहुतांश वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. तर वीजपुरवठ्यासंबंधी ग्राहकांच्या वैयक्तिक तक्रारी निवारणाचे कामे सुरु आहेत.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com