पीए पळवापळवीचा पुणे पॅटर्न; माजी खासादाराचा पीए विद्यमान खासदाराकडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

विरोधी नेत्याचा पीए पळविण्याचे नाट्य शिरुर-हवेली मतदारसंघात सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अनुभवले. आता त्याच नाट्याचा दुसरा प्रयोग  माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या ’पीए’च्या निमित्ताने शिरुर लोकसभा मतदारसंघ पुन्हा अनुभवत आहे.

पुणे : विरोधी नेत्याचा पीए पळविण्याचे नाट्य शिरुर-हवेली मतदारसंघात सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अनुभवले. आता त्याच नाट्याचा दुसरा प्रयोग  माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या ’पीए’च्या निमित्ताने शिरुर लोकसभा मतदारसंघ पुन्हा अनुभवत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तब्बल तीन पंचवार्षिक ’मातोश्री’ची खास निष्ठा असल्याचे समजले जाणारे प्रबोध सावंत हे आढळराव यांचे पीए आता थेट कोल्हेंच्या दरबारी दाखल झाले आहेत. विरोधकांच्या गोटातील सर्व माहिती, कामकाज पध्दती, प्रस्तावित कामे, मंजूरकामे आदींची सर्व रेडी माहिती मिळविण्यासाठी अशा अनुभवी माणसांचा उपयोग होत असतो.  त्यामुळेच अशा मंडळींना मागणी असते. पण थेट विरोधकांकडे जाण्याचे ही मंडळी टाळतात.

महाराष्ट्राचे चार वेगळ्या राज्यांत विभाजन करा; कोणी दिल्ला सल्ला?

याबाबत शिवसेनेचे उपसंपर्कप्रमुख रवींद्र करंजखिले यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की सावंत हे तिकडे का गेले, कुणी मध्यस्थी केली याबाबत आम्हाला सर्व इत्थंभूत माहिती आहे. थोडे थांबा, सावंत साहेब तिकडे का गेले, ते तिकडे काम कसे करणार, काय काम करणार हे काही दिवसांनी सगळ्यांनाच समजेल. राजकारण फक्त ’राष्ट्रवादीलाच समजते असे कोण म्हणते, असाही सवाल त्यांनी विचारला.

भाजप आमदाराची दादागिरी, शेजाऱ्याला मारहाण; व्हिडिओ व्हायरल

याबाबत सावंत म्हणाले की 'मी कट्टर शिवसैनिक आहे. मात्र महाविकास आघाडी झाल्याने ऑफर स्विकारली. माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचेकडील जबाबदारी संपल्यानंतर डॉ. कोल्हेंकडून विचारणा झाली. मी शिवसेनेच्या पुण्यातील आमदारांकडे जाण्याची तयारी केली होती पण; पुण्यात पक्षाला यश आलं नाही. मी माझा प्रामाणिकपणा एवढे वर्ष जपलाय तो शेवटपर्यंत जपणार आहे. मी साठीला आल्याने फार वर्ष काम करेन असेही सांगता येत नाही, असे त्यांनी सांगितले.

छपाक चित्रपटाचा परिणाम; उत्तराखंड सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

शिरूरचे विद्यमान आमदार अशोक पवार यांच्या पहिल्या टर्ममध्ये  सन २००९ ते २०१४ या कालावधीत  महेश बेंद्रे हे त्यांचे खासगी सचिव होते. हे बेंद्रे हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच विरोधी उमेदवार बाबूराव पाचर्णे यांच्या गोटात गेले. प्रचारसभांत बेंद्रे यांनी पवार यांच्या विरोधात भाषणे ठोकली. त्या निवडणुकीत पाचर्णे विजयी झाले आणि बेंद्रे हे त्यांचे पीए झाले. या नंतर बेंद्रे हे स्वत:च राजकारणत उतरले आणि एका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत त्यांनी थेट सरपंचपदाच्या पदासाठीच शड्डू ठोकला. अर्थात इथे त्यांना जसे अपयश आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: EX MP Adhalrao Patil PA Prabodh Sawant Joins Dr Amol Kolhe