
Ex MP Kisanrao Bankhele : एसटी, ट्रक, टेम्पोतून प्रवास करणारे नेते; कसा होता जिवन प्रवास, जाणून घ्या
Ex MP Kisanrao Bankhele - “गरीबांचा नेता अशी प्रतिमा असलेले माजी खासदार लोकनेते (स्व)किसनराव बाणखेले (अण्णा) हे मंचरचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, तीन वेळा आमदार व एक वेळा खासदार म्हणून निवडून आले. एसटी, ट्रक, टेम्पो अश्या मिळेल त्या वाहनाने ते प्रवास करत होते.
त्यांचे राहणीमान साधे होते. सर्वसामान्य गरीब जनतेचा नेता अशी त्यांची प्रतिमा होती. आंबेगाव तालुक्याच्या प्रगतीत व लाला अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता. बँकेच्या माध्यमातून अनेकांना उद्योग व्यवसाय उभारण्यात यश आले असून रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत.”असे लाला अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेचे अध्यक्ष युवराज प्रल्हाद बाणखेले यांनी सांगितले.
मंचर येथे नगरपंचायतीच्या मैदानात लोकनेते किसनराव बाणखेले यांच्या जयंतीनिमित गुरुवारी (ता.१) त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण युवराज बाणखेले, लाला बँकेचे संचालक मंगेश बाणखेले, किसनराव बाणखेले यांचे चिरंजीव रामदास बाणखेले, बाजार समितीचे संचालक जे.के थोरात, मंचर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अँड.अविनाश रहाणे,
कामगार नेते अँड.बाळासाहेब बाणखेले, संतोष गावडे, राजू इनामदार, संजय थोरात, राजाराम बाणखेले, बाळासाहेब विठ्ठलराव बाणखेले,दत्ता गांजाळे, दत्ता थोरात, अश्विनी शेटे, प्रवीण मोरडे, मिरा बाणखेले, संदीप बाणखेले उपस्थित होते. सर्व पक्षातील प्रमुखांनी व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.
लाला अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेच्या मंचर शाखेत बँकेचे उपाध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, संचालक निवृत्ती काळे, अशोक गांधी, संदीप लेंडे, सुनिल भुजबळ, सुरेश भोर, अँड.सुनील बांगर, वसंतराव बाणखेले यांच्या हस्ते किसनराव बाणखेले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी किसनराव बाणखेले यांच्या कार्याचा गौरव केला.
“माजी खासदार किसनराव बाणखेले यांच्या जयंतीच्या दिवशीच भारतीय रिजर्व बँकेने लाला अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेला ओतूर (ता.जुन्नर) येथे शाखा सुरु करण्यास परवानगी दिली आहे.लाला बँकेची १४वी ही शाखा आहे.
बँकेने ४०० कोटी रुपये ठेवीचा टप्पा ओलांडला असून बँकेने दहा हजारहून अधिक लहान मोठ्या उद्योग व्यावसायिकांना २५० कोटीहून अधिक रकमेचा कर्ज पुरवठा केला आहे. बँकेला ऑडीट वर्ग ‘अ’मिळाला आहे.
लवकरच मोबाईल बँकिंग सुरु होणार आहे.”माजी खासदार लोकनेते (स्व) किसनराव बाणखेले यांच्या जयंती निमित त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.