'शाळा नक्की कधी सूरू होणार?अद्याप ठोस निर्णय नाही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

पुणे :कोरोनाचा संसर्ग वाढत असताना देखील १५ जूनलाच शाळा सूरू होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सूरू आहे. असे असले तरीही शाळा सूरू करण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचे शिक्षणाधिकारी सांगत आहेत. त्यामुळे 'शाळा नक्की कधी सूरू होणार' याबाबत पालकांमध्ये दिवसेंदिवस संभ्रम वाढत आहे.

पुणे :कोरोनाचा संसर्ग वाढत असताना देखील १५ जूनलाच शाळा सूरू होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सूरू आहे. असे असले तरीही शाळा सूरू करण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचे शिक्षणाधिकारी सांगत आहेत. त्यामुळे 'शाळा नक्की कधी सूरू होणार' याबाबत पालकांमध्ये दिवसेंदिवस संभ्रम वाढत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही नियमितपणे १५ जुनलाच शाळा सूरू करण्याचा मानस राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मागील आठवड्यात ट्विटरद्वारे जाहीर केले होते. त्यानंतर राज्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही १५ जूनलाच शाळा सुरु करण्यासाठीच्या तयारीचा आढावा शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावर घेतला जात असल्याचे काही मुख्याध्यापकांनी सांगितले. त्यामुळे शाळा सुरू करण्याच्या या भुमिकेची शाळा व्यवस्थापनाने चांगलीच धास्ती घेतली आहे.

--------
वडिलांना सायकलवरून घेऊन जाणाऱ्या ज्योतीने फेटाळला क्रीडामंत्र्यांचा प्रस्ताव
--------
भारतीय शास्त्रज्ञांची कमाल; तयार केला विषाणू नष्ट करणार मास्क; एवढी आहे किंमत
--------
कोरोनाची जगातली परिस्थिती : जाणून घ्या एका क्लिकवर
--------
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील रविवारी दिलेल्या संदेशात,"आपण जुनमध्ये शाळा सूरू करू शकतो की नाही, याबाबत अभ्यास गटासमवेत चर्चा सूरू आहे. लवकरच त्याबाबत निर्णय घेत आहोत," असे सांगितले. तसेच "शाळा सूरू होण्याचा कालावधी पुढे गेला तरी चालेल, पण शिक्षण कसे सूरू राहील हे पाहणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यावरून 'या' आठ शहरांसाठी सुरु झाली विमानसेवा; लोहगाववरून टेक ऑफ

शाळा सूरू करण्याबाबत ठोस निर्णय काय हे जाणून घेण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
त्यामुळे १५ जुनला प्रत्यक्ष शाळा भरणार का, की नियमितपणे १५ जुनला 'शिक्षण' (शाळा नव्हे) सूरू होणार, याबाबत पालकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

दिल्ली, बंगळुरू, अहमदाबाद, चेन्नईसह ८ शहरांसाठी पुण्याहून 'असे' आहे एअर फेअर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Exactly when the school will start is yet to be decided