esakal | डॉक्टर आपल्या दारी : Mobile Dispensaryद्वारे राज्यात तब्बल 'एवढ्या' नागरिकांची तपासणी
sakal

बोलून बातमी शोधा

Examination of more than 1 lakh citizens in the state through Mobile Dispensary during lockdown

उपक्रमा अंतर्गत राज्यात 84 'मोबाईल व्हॅन' सेवेसाठी कार्यरत
- दररोज सुमारे अडीच हजार नागरिकांची तपासणी
- दिवसाला जवळपास 500 रुग्णांमध्ये लक्षणांची चाचपणी केली 
- आतापर्यंत एक लाख अकरा हजार 680 नागरिकांची तपासणी
- राज्यातील विविध भागातून सुमारे अक्राशे संशयित रुग्णांना सरकारी रुग्णालयांत उपचारासाठी पाठविण्यात आले.

डॉक्टर आपल्या दारी : Mobile Dispensaryद्वारे राज्यात तब्बल 'एवढ्या' नागरिकांची तपासणी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्यात दररोज कोरोना बाधित रुग्ण आढळत असल्याने डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर सध्या मोठा ताण निर्माण झाला आहे. या समस्येच्या अनुषंगाने फोर्स मोटर्स व भारतीय जैन संघटना (बीजेएस) यांच्या वतीने संपूर्ण राज्यात “डॉक्टर आपल्या दारी” उपक्रमामार्फत फिरत्या दवाखान्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत एक लाख 11 हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या उपक्रमाची सुरुवात एक एप्रिलपासून झाली असून डॉक्टर, मदतनीस, औषधांनी सुसज्ज असलेल्या या व्हॅन्स आर्थिकदृष्ट्या कमकुवत भागांमध्ये सेवा पुरवत आहेत. तसेच या भागातील नागरिकांची तपासणी केली जात आहे. कोविड 19 ची लक्षणे आढळल्यास त्यांना प्रशासनाने नियुक्त करण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये पाठवण्यात येत आहे. हा उपक्रम शहरातील मुख्य बाजारपेठा आणि पीसीएमसी, औरंगाबाद, धुळे, नाशिक, रत्नागिरी, सांगली, सोलापूर सारख्या विविध शहरांमध्ये सुरू आहे. 

Video : आठ बाय आठ फुटांच्या खोलीत, कसं पाळायचं डिस्टंसिंग?

उपक्रमाविषयी बोलताना फोर्स मोटर्सच्या व्यवस्थापकीय संचालक प्रसान फिरोदिया म्हणाले, “ महाराष्ट्र हे कोरोनाकरिता हॉटस्पॉट ठरले आहे. त्यामुळे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा ताण वाढला आहे. त्यामुळे सध्या मोबाईल डिस्पेनसरीच्या माध्यमातून वैद्यकीय सेवेला मदतीचा हात म्हणून हा उपक्रम राबवत आहे. या उपक्रमाव्यतिरिक्त आमच्या समूहाने (डॉ. अभय फिरोदिया ग्रुप) कोविड-19 मदत कार्यासाठी 25 कोटींची तजवीज केली आहे. या निधीचा वापर आरोग्य सुविधांसाठी, रक्त संग्रह क्षमता वाढवणे, मोबाईल क्लिनिक/टेस्टींग क्षमता उपलब्ध करून देणे आणि गरजूंना मोफत अन्न पुरवठा करण्यासाठी केला जाणार आहे."

ठरलं : पुण्यात विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडणार

"या उपक्रमाच्या माध्यमातून डॉक्टरांनी लिहून दिलेली सर्व औषधे मोफत पुरवली जात आहेत. तसेच व्हॅनमधील डॉक्टर रुग्णांची ताप आणि सर्दी-खोकल्याची तपासणी करतात आणि त्यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे अनुपालन करण्याविषयी सांगतात. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव समूळ उच्चाटन होईपर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे."
- शांतीलाल मुथा, संस्थापक- बीजेएस

"लिव्ह इन रिलेशनशिप'"मध्ये राहणाऱ्या जोडप्यात लॉकडाऊनमुळे उडाले खटके; मग...!

'डॉक्टर आपल्या दारी' उपक्रमाच्या कार्यसेवेबाबत 

- उपक्रमा अंतर्गत राज्यात 84 'मोबाईल व्हॅन' सेवेसाठी कार्यरत
- दररोज सुमारे अडीच हजार नागरिकांची तपासणी
- दिवसाला जवळपास 500 रुग्णांमध्ये लक्षणांची चाचपणी केली 
- आतापर्यंत एक लाख अकरा हजार 680 नागरिकांची तपासणी
- राज्यातील विविध भागातून सुमारे अक्राशे संशयित रुग्णांना सरकारी रुग्णालयांत उपचारासाठी पाठविण्यात आले.
 

सावधान! पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना संसर्गाने शंभरी ओलांडली

loading image