अंजिराचे चारपट उत्पादन पाहिजे; तर करा हा प्रयोग

दत्ता भोंगळे
Friday, 7 August 2020

गराडे काळेवाडी (ता. पुरंदर) येथे अंजिराची खरड छाटणी केली आहे. ही छाटणी सहसा कोणी करत नाही. पण या छाटणीमुळे झाडाला चार पट फुटवा येऊन, अधिक उत्पादन म्हणजे जवळ जवळ चार पट उत्पादन घेता येईल अशी खात्री अखिल महाराष्ट्र अंजिर उत्पादन संशोधन संघाचे पुण्याचे सचिव दिलीप विष्णुपंत जाधव यांनी व्यक्त केली.

गराडे काळेवाडी (ता. पुरंदर) - येथे अंजिराची खरड छाटणी केली आहे. ही छाटणी सहसा कोणी करत नाही. पण या छाटणीमुळे झाडाला चार पट फुटवा येऊन, अधिक उत्पादन म्हणजे जवळ जवळ चार पट उत्पादन घेता येईल. अशी खात्री अखिल महाराष्ट्र अंजिर उत्पादन संशोधन संघाचे पुण्याचे सचिव दिलीप विष्णुपंत जाधव यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दोन वर्षांपूर्वी दुष्काळाचे सावट होते. त्यामुळे अंजीर बागांना टॅंकरने पाणी द्यावे लागले. या पाण्याचा खर्च ३ लाख रुपये झाला. यात उत्पादन व उत्पादन खर्च याचा विचार केला असता जवळजवळ तोट्यातच गणित होते.

पुणे पोलिसांनी गणेशोत्सवाबद्दल घेतला मोठा निर्णय; गणेश मंडळांना केले 'हे' आवाहन!

पण यात झाडे मात्र जिवंत राहिली असे चित्र होते. त्यानंतर यावर्षी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मुंबई, पुणे तसेच इतर ठिकाणची मार्केट बंद होती. तसेच स्थानिक तालुक्यातही सासवड येथील बाजार बंद होता. या लॉकडाऊमुळे शेतकऱ्यांची अंजिरे झाडावरच पिकून खराब झाली. तर काही शेतकऱ्यांनी बाजारात अंजीर तोडून विक्रीचा प्रयत्न केला. पण साधारण ८ किलो अंजिर पाटीला एरवी ८०० रुपये मिळतात. त्या पाटीला कोरोनाच्या काळात १०० ते २०० रुपये बाजारभाव मिळाल्यामुळे अंजीर उत्पादनात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्वाचा विचार करता आपण खरड छाटणी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिलीप जाधव यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले ही छाटणी आपण एक फुट केली आहे. यात नेहमी पेक्षा चार फुटवे फुटतील. त्यामुळे  चारपट अधिकचे उत्पादन मिळुन गेल्या दोन वर्षातील खर्च निघेल.

कोरोना हा उपचाराविना बरा होणारा किरकोळ आजार; झेडपी सभापतींनी सांगितला स्वत:चा अनुभव​

खरड छाटणीची वैशिष्ट्ये - प्रत्येक झाडाच्या १५ ते २०  फांद्या ठेवून बाकीचे झाड पुर्ण रिकामे होते. यामुळे बागेत स्वच्छ प्रकाश पडतो. झाडाची उंची कमी होऊन खवले कीड व तांबेरा सारखा रोगाचा नायनाट होतो. झाडांची उंची कमी झाल्याने मशागत करणे सोपे जाते. फळे तोडण्यासाठी ज्यादाची मेहनत घ्यावी लागत नाही. झाडाची पाने पूर्ण गेल्यामुळे जुन्या रोगांचा नायनाट व किडीचा प्रादुर्भाव यामुळे कमी होतो. उत्पादनात वाढ होते. औषध फवारणी करणे सहज शक्य होईल अशी माहिती अखिल महाराष्ट्र अंजिर उत्पादन संशोधन संच पुण्याचे उपाध्यक्ष रामचंद्र खेडेकर यांनी दिली.

अंजीराला कोवळी पाने फुटल्यानंतर साधारणत: छाटणीनंतर २० दिवसापासून १५ दिवसाच्या अंतराने क्लोरोथॅलोनील ०.२ टक्के (२० ग्रॅम) अधिक कार्बेनडॅझीम (१० ग्रॅम) प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारावे.
किंवा कार्बेनडॅझीम (१० ग्रॅम) अधिक मॅन्कोझेब (२५ ग्रॅम) किंवा कार्बेनडॅझीम (१० ग्रॅम) अधिक कॅप्टन (२० ग्रॅम) वरील पैकी कोणतीही एक फवारणी आलटून पालटून करावी. अंजीर काढणीच्या एक महिना अगोदर फवारणी बंद करावी अशी माहिती कृषी सहायक अनिल पाटील यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: experiment on Figs tree for more production