फेस्टिव्हल ऑफ द फ्युचर उद्यापासून

Business
Business

पिंपरी - महापालिकेतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल ऑफ द फ्युचर उपक्रमाचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता. २८) आयुक्‍त श्रावण हर्डीकर आणि महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता होणार आहे. या वेळी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. चिंचवडमधील ऑटो क्‍लस्टरच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल.

दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये कौशल्यविकास, स्टार्टअप या विषयांवर चर्चा होणार असून, त्यामध्ये विविध क्षेत्रांत काम करणारे उद्योजक सहभागी होतील. या वेळी स्टार्टअप उद्योगातील २० व्यावसायिकांनी केलेल्या प्रकल्पांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. 

सकाळी अकरा वाजता हॅकेथॉनला सुरुवात होईल. दुपारी बारा वाजता फ्युचर टॉक या कार्यक्रमामध्ये अक्षय मल्होत्रा (संस्थापक, अर्ली सॅलरी), संदेश सॅलियन, (संचालक, डाली ॲण्ड समीर इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड), विन्नी पॅट्रो (कार्यकारी अधिकारी व संस्थापक, रिकॉर्डन्ड) आणि तरुण मेहता (संस्थापक, ॲन्थर एनर्जी) यांची भाषणे होतील. दुपारी अडीच वाजता पिचफेस्टवर कार्यशाळेचे आयोजन केले आहे. संध्याकाळी डॉ. अभय जेरे (मुख्य माहिती अधिकारी, केंद्रीय मनुष्यबळ विभाग), हणमंत गायकवाड (संस्थापक, भारत विकास ग्रुप), उदयन कानडे (संस्थापक, ओनिरिस्क) आणि हिमांशू रतन (पार्टनर, केपीएमजी) यांची भाषणे होतील. 

दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता हेल्थ ॲण्ड फिटनेस या अंतर्गत विशाल गोंडल (संस्थापक, गोक्‍यूई), जितेंद्र चोक्‍सी (संस्थापक, एफआयटीटीआर), सिद्धार्थ देशमुख (संस्थापक, आरिमाया व्हेंचर्स), प्रसाद कुलकर्णी (संस्थापक, प्रसादिती मेडिकल इक्विपमेंट) हे मार्गदर्शन करतील. दुपारी तीन वाजता होणाऱ्या सत्रामध्ये जे. ए. चौधरी (आयटी सल्लागार, तमिळनाडू सरकार), विष्णू मनोहर (विष्णूजी की रसोई), 
लोव्हिना लिनोर्डो (संस्थापक, एव्हरिथिंग एक्‍सपेक्‍टस) आणि क्रिस रोझारिओ यांची भाषणे होतील. डीसीएफ व्हेंचर हे या उपक्रमाचे नॉलेज पार्टनर आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com