...अन् तब्बल पन्नास दिवसांनतर पुण्याला आली जाग

Fifty days later the city of Pune slowly began to recover from corona outbreak
Fifty days later the city of Pune slowly began to recover from corona outbreak

पुणे : गेल्या पन्नास दिवसांहून अधिक काळ ठप्प पडलेल्या पुणे शहरातील व्यवहार चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये हळूहळू पुर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. मात्र अनेक व्यापारी आणि उद्योजकांमध्ये काहीसे गोंधळाचे वातावरण असल्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवणेच पसंत केले असल्याचे शहरात फेरफटका मारल्यानंतर दिसून आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून 23 मार्च पासून लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे शहरातील जीवनावश्‍यक वस्तू आणि औषधांची दुकाने सोडली, तर सर्व बाजारपेठा बंद होत्या. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन मध्ये काही प्रमाणात शिथिल करण्यात येईल, अशी घोषणा राज्य सराकरकडून करण्यात आली होती. त्यानुसार चौथ्या लॉकडाऊनची नियमावली कालच राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली. त्यानुसार महापालिकेने शहरातील रेडझोन वगळता काही भागात दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आज शहरात सकाळच्या वेळेत काही प्रमाणात वर्दळ वाढली होती. शिवाजी रस्ता आणि त्या खालील पेठ व रेडझोनच्या भागात मात्र आज देखील सर्वच दुकाने बंद होती. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्य सरकारने चौथ्या लॉडकाऊनमधील नियमावलीची अंमलबजावणी 22 मे पासून लागू होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे अनेक व्यापारी वर्गात या बाबत संभ्रम असल्याचे दिसून आले. तसेच शहरातील अनेक रस्ते अद्यापही खुले झाले नसल्याने नागरीक आणि व्यापाऱ्यांना दुकाने सुरू करण्यात अडचणी येत असल्याचे दिसून आले. लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, डेक्कन जिमखान्याचा परिसर, कर्वेनगर, सिंहगड रस्ता, नगर रस्ता, सोलापूर रस्त्यावर काही प्रमाणात कपड्याची, पदत्राणे, सोन्याची, इलेक्‍ट्रिकल्सची दुकाने सुरू झाल्याचे पाहवयास मिळाले. तर अनेक हॉटेल व्यावसायिकांनी पार्सल आजपासून पार्सल सेवा सुरू केल्याचे दिसून आले. उपनगरातही नेहमीच्या पेक्षा रस्त्यावरील गर्दीचे अधिक असल्याचे दिसून आले. मात्र तुरळक गिऱ्हाईक असल्याचे अनेक दुकानदारांनी सांगितले. तर काही जणांनी आज दुकाने उघडून साफसाईच्या काम सुरू केले असल्याचे काही ठिकाणी दिसून आले. त्यामुळे हळूहळू का होईना शहराचे जनजीवन पुर्वपदावर येऊ लागले आहे. 

आता मोलकरणींना कामावर जाता येणार पण...

मुख्य बाजारपेठांचा भाग बंदच 
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात देखीले रेडझोनमध्ये जीवनावश्‍यक वस्तू आणि औषधे दुकाने वगळता सर्व दुकाने व व्यापार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. पुणे शहरातील भवानी पेठ, कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसर हा अद्यापही रेडझोन मध्ये आहे. दोन्ही क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरात टिंबर मार्केट मार्केट, इलेक्‍ट्रॉनिक आणि इलेक्‍ट्रिकल, मोबाईल, पत्रा बाझार, प्लॉस्टिक, लोखंड, ऑटोमोबाईल, चमडा बाजार, सराफ बाजार, खाद्यतेल, मासाळी बाजार, दूध बाजार, बांबू बाजार, ट्रान्सपोर्ट आदी बाजारपेठांचा भाग मोठ्या प्रमाणावर आहे. या भागातून संपूर्ण शहरात पुरवठा होतो. हे मुख्य बाजार बंद असल्याने त्यांचा देखील परिणाम शहराच्या अन्य भागातील व्यापारावर होत आहे. 

कोथरुड-कर्वेनगरकर, आता स्वत:ला, कुटुंबाला जपणार अन् कोरोनाला हरविणार

''माझे कुठेकर रस्त्यावर वालिशा नावाचे साडींचे दुकान आहे. साठ ते सत्तर कामगार आहे. मी दुकान सुरू केले आहे. सध्या साफसफाई सुरू आहे. कारण ग्राहक नाही. काही कामगार हे रेडझोनमध्ये राहतात. ते कामावर येऊ शकत नाही. अनेक अडचणी आहेत. त्यामुळे दुकान सुरू झाले का, तर झाले. पण ग्राहक नाही, कामगार नाही, करणार काय?''
- तुषार घोगरी (साड्यांचे व्यापारी) 

 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com