शेतजमिनीच्या वादातून 24 जणांमध्ये अशी रंगली फ्री स्टाइल

crime
crime

नारायणगाव (पुणे) : जुन्नर तालुक्यातील खोडद येथे जमिनीच्या वादातून झालेल्या जबर मारहाणप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी दोन कुटुंबातील चोवीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये यु ट्युब चॅनेलच्या दोन पत्रकारांचा समावेश आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.

शरद पवार पुन्हा ठरले चाणक्य
 
पत्रकार रवींद्र पंढरीनाथ खुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरेंद्र उर्फ बन्सी सोनू घायतडके, वनिता सुरेंद्र घायतडके, अनिकेत सुरेंद्र घायतडके, आकाश सुरेंद्र घायतडके, अस्मिता उर्फ बायडी सुरेंद्र घायतडके, सुनील घायतडके, रोहन सुखदेव घायतडके, लहू जबाजी घायतडके, पुष्पा लहू घायतडके, गौतमी विलास घायतडके, शंकर मुक्ताजी घायतडके, प्रितेश सुनील घायतडके, नीलेश सुखदेव घायतडके, सचिन भोजने (पत्रकार), नवीन सोनवणे (सर्व राहणार खोडद) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर, अस्मिता बन्सी घायतडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लता पंढरीनाथ खुडे, पुष्पा रवींद्र खुडे, पंढरीनाथ रामभाऊ खुडे, आकाश बबन खुडे, सुमन बबन खुडे, रमाकांत खुडे, रंजाबाई काशिनाथ खुडे, नीलेश गेनूभाऊ खुडे, रवींद्र खुडे (सर्व रा. खुडेवस्ती, खोडद) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

आमच्या शेत जमिनीतील माती का नेली, असा जाब विचारल्यावरून झालेल्या भांडणातून सुरेंद्र घायतडके यांच्या कुटुंबातील पंधरा सदस्य व नातेवाईक यांनी खुडे कुटुंबातील नऊ जणांना बेदम मारहाण केली, अशी तक्रार रवींद्र खुडे यांनी दिली आहे. तर, रवींद्र खुडे यांनी शिवीगाळ करून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी घायतडके कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण केली असल्याची तक्रार अस्मिता घायतडके यांनी दिली आहे. परस्पर विरोधी दाखल झालेल्या फिर्यादी वरुन पोलिसांनी खाडे कुटुंबातील नऊ, तर घायतडके कुटुंबातील पंधरा सदस्यांवर पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com