अखेर विमाननगर रस्त्याचे काम सुरू

महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीतही या विषयाचे पडसाद उमटले होते. विमाननगर येथील कोणार्क नगर समोरील हा विमानतळाकडे जाणारा रस्ता गेली आठ वर्ष रखडला होता.
road
roadsakal

वडगाव शेरी : न्यायालयीन स्थगिती उठल्यामुळे तसेच जागामालक व पालिका अधिकारी यांच्यात मोबदला देण्याबाबत तोडगा निघाल्याने आठ वर्षे रखडलेल्या विमाननगर येथील (Vimannagar road) रस्त्याचे काम आज पोलीस बंदोबस्तात (police security) सुरू झाले. आज महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीतही या विषयाचे पडसाद उमटले होते. विमाननगर येथील कोणार्क नगर समोरील हा विमानतळाकडे जाणारा रस्ता गेली आठ वर्ष रखडला होता. जागेचा मोबदला मिळावा याकरता जागा मालकांनी न्यायालयातून रस्त्याच्या कामावर स्थगिती मिळवली होती. त्यानंतर मधल्या काळात अनेकदा आंदोलने झाली. (Finally Vimannagar road work started)

जागा मालक आणि पालिका अधिकारी यांच्यासोबत बैठका झाल्या. परंतु या प्रस्तावावर तोडगा निघत नव्हता. जागा मालकांचा मोबदला देण्याची तयारी पुणे महानगरपालिकेने दाखविल्यानंतर न्यायालयाने रस्त्याच्या कामाला असलेली स्थगिती चार दिवसांपूर्वी उठवली. स्थानिक नागरिकांसोबत स्थायी समिती सदस्य राहुल भंडारे यांनी

road
आखाड स्पेशल : पुण्यात खिशाला परवडतील अशा 10 नॉन-व्हेज थाळी

पालिका आयुक्तांकडे या प्रश्नाबाबत पाठपुरावा करून स्थायी समितीच्या बैठकीत हा मुद्दा मांडला होता. त्यानंतर चार दिवसांपूर्वी रस्त्याचे काम सुरू झाले होते. जागा मालकांनी मोबदला न मिळाल्याची हरकत घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून काम थांबवले होते.

आज स्थायी समितीच्या बैठकीत या रस्त्याचा मुद्दा नगरसेवक राहुल भंडारी यांनी पुन्हा मांडला. रस्ता आज पूर्ण करू असे पथ विभाग प्रमुख विजय कुलकर्णी यांनी सांगितल्यानंतर महापालिका प्रशासनाने सूत्रे हलवली. सायंकाळी चार वाजता खडी भरलेल्या गाड्या, डंपर, रोलर रस्त्यावर दाखल झाले आणि त्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली.

road
कोंढव्यात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

काही जागा मालकांनी आजही रस्त्याच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मोबदला मिळाला नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे कोणार्क नगर रहिवाशांनी व व्यापाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

संदीप सिंग ( अध्यक्ष - कोणार्क नगर गृहरचना संस्था)

गेली आठ वर्षे रखडलेला रस्ता आज होत आहे. राहुल भंडारे यांनी पालिका आयुक्तांकडे आणि स्थायी समितीत विषय लावून धरल्याने हा प्रश्न सुटण्यास मदत झाली. इतर राजकीय मंडळींनी आता राजकारण थांबवावे.

संजय धारव (उपअभियंता, पथ विभाग)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com