धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार; इस्टेट एजंटविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 January 2021

दोन वर्षांपुर्वी फिर्यादी महिलेस स्वस्थात भाड्याने घर घ्यायचे होते. त्यासाठी तिने ठोकळ याच्या वारजे येथील यश रिअल इस्टेट या कार्यालयात गेली. तेव्हा ठोकळने महिलेचा मोबाईल क्रमांक घेऊन तिच्याशी ओळख वाढविली. 

पुणे : घर भाड्याने मिळवून देण्याच्या निमित्ताने महिलेशी ओळख वाढवित तिला लग्न करण्याचे आमिष दाखवित एका ईस्टेट एजंटाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात इस्टेट एजंटाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संदिप विशाल ठोकळ (वय 32, रा. गणेशपुरी सोसायटी, रामनगर, वारजे माळवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी 39 वर्षीय महिलेने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मराठ्यांच्या ध्येयाचा पानिपतमध्ये विजय 

फिर्यादीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही परिचारीका म्हणुन कार्यरत आहे. तर ठोकळ हा इस्टेट एजंट आहे. दोन वर्षांपुर्वी फिर्यादी महिलेस स्वस्थात भाड्याने घर घ्यायचे होते. त्यासाठी तिने ठोकळ याच्या वारजे येथील यश रिअल इस्टेट या कार्यालयात गेली. तेव्हा ठोकळने महिलेचा मोबाईल क्रमांक घेऊन तिच्याशी ओळख वाढविली. त्यानंतर महिलेला लग्नाची मागणी घालून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

दरम्यान, ठोकळ याची पत्नी त्याच्याशी भांडण करून माहेरी निघून गेल्यानंतर त्याने फिर्यादीस मुलांसाठी जेवणाचा डबा घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादीकडे शारीरीक संबंधाची मागणी केली, तेव्हा फिर्यादीने त्यास विरोध केला. त्यामुळे त्याने चिडून फिर्यादीस मारहाण करुन घरामध्ये डांबुन ठेवत शारिरीक संबंध ठेवले. हा प्रकार फिर्यादीने फोनवरुन तिच्या मैत्रीणीला सांगितला. त्यानंतर मैत्रीणीने पोलिसांच्या मदतीने फिर्यादीची सुटका केली. या प्रकरणामध्ये छावा क्रांतीवीरसेनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा छाया खैरनार यांनीही याप्रकरणी मदत केली. 
 

आर्थिक क्षेत्रात करिअर करायचंय? चिंता करण्याचे कारण नाही 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FIR filed against estate agent for sexually abusing a woman by showing her the lure of marriage