Video : पेटलेली कार दिसताच कारकडे धावला जवान अन्...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

जवान मयूर यांचे वडील रामचंद्र गोसावी हे पुणे अग्निशमन दलाच्या मुख्यालयात कार्यरत आहेत.

पुणे : कात्रज-बालाजीनगर येथील उड्डाणपूलावर एका चारचाकी वाहनाने पेट घेतल्याची घटना शनिवारी (ता.1) रात्री आठच्या सुमारास घडली. यावेळी पीएमआरडीए मारुंजी येथे कार्यरत असणारे जवान मयूर गोसावी यांनी ही घटना पाहताच तातडीने आगीवर नियंत्रण मिळवत आपले कर्तव्य चोख बजावले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बालाजीनगर येथील उड्डाणपूलावर होंडा सिटी कंपनीच्या कारने अचानक पुढील बाजूने पेट घेतला व रस्त्यावर एकच गोंधळ उडाला. तेथून घरी जात असलेले पीएमआरडीए जवान गोसावी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निरोधक उपकरणाचा वापर करत आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच पुणे अग्निशमन दलाशी संपर्क साधून मदत मागविली. या घटनेत कोणी जखमी नाही.

- पुणेकरांसाठी खुशखबर! वर्षाभरात पीएमपीला मिळणार 984 बसचा बूस्टर!

आग वेळीच विझवल्याने तेथे उपस्थित नागरिकांनी आणि कात्रज अग्निशमन केंद्रातील जवान यांनी पीएमआरडीए जवान मयूर गोसावी यांचे कौतुक केले. पीएमआरडीएचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनीदेखील याची दखल घेत त्यांच्या या जवानाचे विशेष कौतुक केले. जवान मयूर यांचे वडील रामचंद्र गोसावी हे पुणे अग्निशमन दलाच्या मुख्यालयात कार्यरत आहेत.

- पुणे : ... अन् पोलिसांच्या मदतीने महिलांनी रोखला बालविवाह!

- Budget 2020 : अर्थसंकल्पात महिलांसाठी काहीही नवीन नाही : सुप्रिया सुळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire brigade jawan saves burning car at Balaji Nagar in Pune