Fire at Serum Institute : आगीची दुर्घटना की घातपात

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 January 2021

सीरमच्या स्थापनेपासून म्हणजे, 1966 पासून आतापर्यंत संस्थेत किरकोळ आगीच्या घटना घडल्या; मात्र, एवढी भीषण आग पहिल्यांदाच लागल्याची माहिती संस्थेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

पुणे : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधील आग ही दुर्घटना की घातपात ? यावर आता तपास यंत्रणांनी आपल्या नजरा वळवल्या आहेत. त्याचवेळी सोशल मीडियावरही याच मुद्यावर चर्चा झडल्या. 

सीरमच्या स्थापनेपासून म्हणजे, 1966 पासून आतापर्यंत संस्थेत किरकोळ आगीच्या घटना घडल्या; मात्र, एवढी भीषण आग पहिल्यांदाच लागल्याची माहिती संस्थेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

Fire at Serum Institute : मृत भावाची कपडे पाहताच अविनाशने फोडला हंबरडा  

गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जगाचे लक्ष सीरमच्या कोव्हिशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लशीकडे लागले होते. त्यात 12 जानेवारीपासून देशभरात या लशीचे वितरण सुरू झाले. या पार्श्‍वभूमीवर अवघ्या नऊ दिवसांमध्येच सीरमच्या मांजरीतील महत्त्वाच्या प्रकल्पात आग लागल्याची घटना घडली. एकीकडे लसीचे वितरण आणि ही घटना, यांचाही काही संबंध आहे का, यादृष्टीने तपासाची चक्रे फिरू लागली आहेत. 

"या घटनेसंदर्भात आता निश्‍चितपणे मत नोंदविणे अवघड आहे. जगभरातील 170 देशांना विविध स्वरूपाच्या आजारांवरील लस पुरविणाऱ्या या संस्थेत आग लागली कशी ? याचा शोध घेण्यात येत आहे. या ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी असून, तिथे मोबाईलदेखील नेता येत नाही. तेव्हा, आगीचे कारण नेमके काय असेल, हे सर्व पातळ्यांवर तपासत असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

..'ते' अखेरपर्यंत आगीशी झुंजत राहीले  

"सीरम'मधील आगीचे चित्रीकरण आणि छायाचित्रे "सोशल मीडिया'वर व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी दुपारपासूनच घटनेबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली. अगदी सामान्य नागरिकांपासून बडे राजकीय नेतेही या चर्चेच्या शर्यतीत उतरल्याचे पाहायला मिळाले.

पुणे : 'व्हॉल्वो मॅगीरस'ने दिली सीरमची आग विझविण्यास पुणे अग्निशामक दलास साथ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire at Serum Institute Accident or act of sabotage