पुण्यातील महाविद्यालयांचा कट-ऑफ नव्वदीपार; २२ टक्क्यांपर्यंत वाढ!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 31 August 2020

- अकरावी प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीचा कट-ऑफ जाहीर
- गेल्या वर्षीच्या तुलनेत "कट-ऑफ' साधारणत: चार ते दहा टक्‍क्‍यांनी वाढला

पुणे : अकरावी प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीत शहरातील नामांकित महाविद्यालयांचा कट-ऑफ तब्बल चार ते दहा टक्‍क्‍यांनी वाढल्याचे दिसून येत आहे. त्यात एका महाविद्यालयाचा कला विनाअनुदानित अभ्यासक्रमाचा कट ऑफ मागील वर्षाच्या तुलनेत 22 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. अकरावी प्रवेशाचा कट-ऑफ मोठ्या प्रमाणात वाढण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेसह सीबीएसई, आयसीएसई अशा विविध मंडळाच्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात एकूणच यंदा वाढ झाली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी अकरावी प्रवेशाचा कट-ऑफ वाढणार हे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. यंदा कट-ऑफ वाढल्यामुळे नामाकिंत महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमधील चुरसही वाढणार असल्याचे चित्र पहिल्या गुणवत्ता यादीतूनच स्पष्ट होत आहे. 

विद्यार्थ्यांनो पुणे विद्यापीठात अॅडमिशन घ्यायचंय? तुमच्याकडे आहे शेवटची संधी

"दहावीच्या एकूण निकालाची टक्केवारी यंदा वाढली असल्याने अकरावी प्रवेशाचा कट-ऑफ पाच ते सात टक्‍क्‍यांनी वाढेल, असे यापूर्वीच सांगितले होते. महाविद्यालयात यंदा विनाअनुदानित कला शाखेचा (इंग्रजी माध्यम) कट ऑफ हा विज्ञान शाखेच्या तुलनेत अधिक आहे. तर अनुदानित विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमाचा कट ऑफ गेल्यावर्षीच्या तुलनेत 4.20 टक्‍क्‍यांनी, विनाअनुदानित विज्ञान शाखेचा 12.40 टक्‍क्‍यांनी, अनुदानित वाणिज्य शाखेचा 6 टक्‍क्‍यांनी आणि अनुदानित कला शाखेच्या (मराठी माध्यम) अभ्यासक्रमाचा कट ऑफ तब्बल 22 टक्‍क्‍यांनी वाढला आहे.''
- डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय (शिवाजीनगर)

Ganeshotsav 2020 : १२८ वर्षांत पहिल्यांदाच मिरवणूकीविना होणार बाप्पाचं विसर्जन!

शहरातील नामाकिंत महाविद्यालयाचा पहिल्या फेरीतील कट-ऑफ (टक्केवारीत) :
महाविद्यालयाचे नाव : शाखा : कट-ऑफ (टक्केवारीत)
फर्ग्युसन महाविद्यालय : कला (मराठी) : 92 टक्के
फर्ग्युसन महाविद्यालय : कला (इंग्रजी) : 97.4 टक्के
फर्ग्युसन महाविद्यालय : विज्ञान : 97 टक्के
बीएमसीसी : वाणिज्य : 96.4 टक्के
सिंबायोसिस महाविद्यालय : कला : 96.6टक्के
सिंबायोसिस महाविद्यालय : वाणिज्य : 94.2 टक्के
विमलाबाई गरवारे कनिष्ठ महाविद्यालय : वाणिज्य : 91.2 टक्के
विमलाबाई गरवारे कनिष्ठ महाविद्यालय : विज्ञान : 93 टक्के
सर परशुरामभाऊ महाविद्यालय : कला (मराठी) : 84. 6 टक्के
सर परशुरामभाऊ महाविद्यालय : कला (इंग्रजी) : 95.8 टक्के
सर परशुरामभाऊ महाविद्यालय : वाणिज्य : 92.6 टक्के
सर परशुरामभाऊ महाविद्यालय : विज्ञान : 95.2 टक्के
आबासाहेब गरवारे कॉलेज : कला : 74.6 टक्के
आबासाहेब गरवारे कॉलेज : विज्ञान : 94.8 टक्के
विद्याभवन ज्युनिअर कॉलेज : विज्ञान : 90.2 टक्के
महाराष्ट्र विद्यालय : विज्ञान : 95.2 टक्के
एमआयटी ज्युनिअर कॉलेज : वाणिज्य : 92.8 टक्के
एमआयटी ज्युनिअर कॉलेज : विज्ञान : 94.2 टक्के
मुक्तांगण ज्युनिअर कॉलेज : विज्ञान : 90.8 टक्के
लक्ष्मणराव आपटे ज्युनिअर कॉलेज : वाणिज्य : 90.4 टक्के
लक्ष्मणराव आपटे ज्युनिअर कॉलेज : विज्ञान : 96.6 टक्के
एमएमसीसी : वाणिज्य : 90 टक्के
एमएमसीसी : विज्ञान : 93.8 टक्के
मॉर्डन कॉलेज, शिवाजीनगर : कला (मराठी) : 75.8 टक्के
मॉर्डन कॉलेज, शिवाजीनगर : वाणिज्य : 92 टक्के
मॉर्डन कॉलेज, शिवाजीनगर : विज्ञान : 94.8 टक्के
रेणुका स्वरूप ज्युनिअर कॉलेज फॉर गर्ल्स : वाणिज्य : 84.8 टक्के
एमईएस गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स : वाणिज्य : 93.8 टक्के
नुमवि हायस्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेज : वाणिज्य : 86.8 टक्के
नुमवि हायस्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेज : विज्ञान : 92 टक्के
नेस वाडिया महाविद्यालय : वाणिज्य : 89.4 टक्के
नौरोसजी वाडिया महाविद्यालय : कला (इंग्रजी) : 93.4 टक्के
नौरोसजी वाडिया महाविद्यालय : विज्ञान : 91.4 टक्के

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In first merit list of FYJC admission cutoff of colleges has increased by four to ten percent