पुणे : पीठ गिरणी चालक महिलेला कोरोना; दळणाला आलेल्यांचा शोध सुरु

निलेश बोरुडे
रविवार, 28 जून 2020

सदर महिलेच्या घरी पिठाची गिरणी असल्याने परिसरातील अनेक कुटुंबांतील दळण तेथूनच दळले जायचे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून आरोग्य सेविका पद्मिनी जगताप या मागील आठ दिवसांमध्ये 'त्या' महिलेच्या घरी दळण दळण्यासाठी कोण कोण आले त्याची माहिती गोळा करत आहेत.​

किरकटवाडी(पुणे) : मागील काही दिवसांपासून किरकटवाडीची(ता.हवेली) रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून आता पिठाची गिरणी चालक असलेली 36 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आली आहे .त्यामुळे किरकटवाडीची आतापर्यंतची एकूण रुग्ण संख्या 8 झाली असून त्यापैकी 4 रुग्ण पूर्णपणे बरे झालेले आहेत तर इतर 4 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ताप,खोकला व अशक्तपणा जाणवू लागल्याने सदर महिलेला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे या महिलेची कोरोना तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. या महिलेला मधुमेहाचाही आजार असल्याची माहिती मिळत आहे. या महिलेच्या घरातील इतर सहा व्यक्तींना तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून इतर संपर्कात आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात येत असल्याची माहिती खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉक्टर वंदना गवळी यांच्याकडून देण्यात आली.

लग्नाच्या पूजेनंतर डीजे लावून सुरू होता डान्स, पोलिसांनी काढली अशी वरात

सदर महिलेच्या घरी पिठाची गिरणी असल्याने परिसरातील अनेक कुटुंबांतील दळण तेथूनच दळले जायचे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून आरोग्य सेविका पद्मिनी जगताप या मागील आठ दिवसांमध्ये 'त्या' महिलेच्या घरी दळण दळण्यासाठी कोण कोण आले त्याची माहिती गोळा करत आहेत.

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होणार...

किरकटवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रुग्ण आढळलेल्या बापुजीबुवा नगर परिसरात औषध फवारणी करण्यात येत असून हवेली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्याकडून रुग्ण आढळलेला परिसर सील करण्यात आलेला आहे.

जिजा आणि दाजी; वाचा शरद पवार यांच्या लग्नाची गोष्ट!

सध्या खानापूर येथील 8, खडकवासला येथील 3, किरकटवाडी येथील 4 व नांदेड येथील 1 अशी परिसरातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 16 आहे.प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत असले तरी नागरिकांकडून आरोग्याबाबत योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याने पुणे शहराला लागून असलेल्या या गावांतील रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. 

पुण्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतीच, आता तुम्हीच तुमचे रक्षक व्हा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flour mill driver female tested corona positive in Kirkatwadi pune