esakal | कोरेगाव भीमा शौर्यदिन : विजयस्तंभास फुलांची सजावट
sakal

बोलून बातमी शोधा

Flower decoration at the Victory Pillar at Koregaon Bhima for Gallantry Day

- राज्याच्या विविध भागातील नागरिकांबरोबरच पुस्तकविक्रेते व स्टॉलधारकही मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. 
- आमदार रोहित पवार; तसेच आमदार ऍड. अशोक पवार यांनी विजयस्तंभाला भेट देऊन अभिवादन केले
-  कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीनेही विजयस्तंभाला फुलांची सजावट करण्यात आली.
- उद्या (बुधवार) 'शौर्यपहाट' कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

कोरेगाव भीमा शौर्यदिन : विजयस्तंभास फुलांची सजावट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोरेगाव भीमा : ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून नागरिक पेरणेफाटा (ता. हवेली) येथे दाखल होण्यास मंगळवारी सुरुवात झाली. प्रशासनाचीही तयारी पूर्ण झाली आहे. विजयस्तंभास फुलांची सजावट करण्यात आली आहे. 

कोरेगाव भीमा : विजयस्तंभास अजित पवार, प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन

राज्याच्या विविध भागातील नागरिकांबरोबरच पुस्तकविक्रेते व स्टॉलधारकही मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. मंगळवारी दुपारपासून विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे कोरेगावात सरपंच संगीता कांबळे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी; तर पेरणे येथे सरपंच रूपेश ठोंबरे, ग्रामविकास अधिकारी नंदकुमार चव्हाण व पदाधिकाऱ्यांनी गुलाब पुष्प व पाणी देऊन स्वागत केले. 


कोरेगाव भीमाला जातायं? असा आहे वाहतुकीचा मार्ग

दरम्यान, आमदार रोहित पवार; तसेच आमदार ऍड. अशोक पवार यांनी विजयस्तंभाला भेट देऊन अभिवादन केले. तेथे त्यांनी नागरिक; तसेच पोलिसांशी संवाद साधला. या वेळी पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे, संजीवनी कापरे आदी उपस्थित होते. रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी सायंकाळी विजयस्तंभाला भेट देऊन अभिवादन केले. या वेळी त्यांनी विजयस्तंभाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच येथे होणारी गर्दी व वाहतूक कोंडीवर उड्डाण पुलासारख्या ठोस उपायांसाठी राज्य सरकारने कार्यवाही करणे गरजेचे सांगितले. 

कोरेगाव भीमा प्रकरण : संशयितांवर होणार आरोप निश्चिती
 

समता सैनिक दलाचे उजळणी शिबिर आज झाले. कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीनेही विजयस्तंभाला फुलांची सजावट करण्यात आली. उद्या (बुधवार) 'शौर्यपहाट' कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

अभिवादन दिन : शांतता अन् समन्वयाचे वातावरण

वाहतुकीत बदल 
पुणे-नगर महामार्गावरील वाहतुकीत उद्या (बुधवार) रात्री 12 पर्यंत बदल करण्यात आला आहे. पेरणे टोल नाका ते शिक्रापूरदरम्यान केवळ अंतर्गत प्रवासासाठी असलेल्या बस वगळता इतर वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. शिक्रापूर ते खराडी बायपास दरम्यानची जड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली आहे. 

loading image