भाजपच्या नाराज माजी आमदार मेधा कुलकर्णी अजितदादांच्या भेटीला...

ज्ञानेश सावंत
Friday, 25 September 2020

भारतीय जनता पक्षातील नाराज नेत्या आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवारांची पुण्यात भेट घेतली; आगामी विधान परिषद निवडणुकीनिमित्ताने कुलकर्णी या अजितदादांच्या संपर्कात गेल्याने त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या भेटीची कुबली देत, ती राजकीय स्वरुपाची नसल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

पुणे : भारतीय जनता पक्षातील नाराज नेत्या आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवारांची पुण्यात भेट घेतली; आगामी विधान परिषद निवडणुकीनिमित्ताने कुलकर्णी या अजितदादांच्या संपर्कात गेल्याने त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या भेटीची कुबली देत, ती राजकीय स्वरुपाची नसल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. नागरिकांची कामे घेऊन अजितदादांकडे आल्याचेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत कुलकर्णी या कोथरुडमधून आमदार झाल्या. त्यानंतरच्या निवडणुकीत म्हणजे 2019 मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांना कोथरुडमधून तिकिट देत, भाजप नेतृत्वाने कुलकर्णी यांचा पत्ता कट केला. त्यावरून कुलकर्णी आणि त्यांचे काही समर्थक पक्षश्रेष्ठींवर प्रचंड नाराज झाले. परिणाम, या निवडणुकीसह पुढच्या काळात कुलकर्णी नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे आजही साऱ्यांचे लक्ष आहे. पक्षातील अंतर्गत वादातून कुलकर्णी यांचा राजकीय बळी घेतला गेल्याची चर्चा नेहमीच राजकीय वर्तुळात सुरू असते. त्यात पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची आशा कुलकर्णी यांना आहे.

Video : अजित पवार यांनी पुण्यातील मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना

कुलकर्णी यांच्यासह भाजपमधील काही नेते आतापासूनच "फिल्डिंग'लावून आहेत. अर्थात, नवी आमदारकी मिळविण्यासाठी कुलकर्णी यांना पक्षांतर्गत अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार असल्याचे स्पष्ट आहे. राजकीय कोंडीच्या पार्श्‍वभूमीवर कुलकर्णी यांनी शुक्रवारी पुण्यात अचानक अजितदादांची भेट घेतली. त्यामुळे कुलकर्णी या भाजप सोडून राष्ट्रवादी कॉंग्रसमध्ये जातील आणि या पक्षाकडून विधानपरिषदेची उमेदवारी घेतील, असा अंदाज बांधण्यात येत आहे. मात्र, उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीत राजकीय विषय नव्हता. त्याला कोणी राजकीय स्वरुप देऊ नये, असे कुलकर्णी यांनी सांगितले. 

काळजी घ्या, तुम्ही कोरोनावर मात करून लवकरच बरे व्हाल !

कुलकर्णी म्हणाल्या, ""नागरिकांची कामे रखडल्याबाबत उपमुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली होती. ती मिळाल्याने आमची भेट झाली. संबंधित विषय त्यांच्या कानावर घातला आहे. गेली चार वर्षे म्हणजे, 2016 पासून पाठपुरावा करूनही काम होत नसल्याने मला पुढाकार घ्यावा लागला. विषय मार्गी लागण्याची आशा आहे. महापालिकेशी संबंधितही कामे असतात. अजितदादा पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांची भेट घेऊन माझ्या मतदारांच्या प्रश्नांबाबत त्यांच्याशी चर्चा केली.''  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MLA Medha Kulkarni called on Deputy Chief Minister Ajit Pawar in Pune