खडकवासल्याचे माजी सरपंच जयगुरु मते यांचे अपघाती निधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

अगदी सोमवारी रात्री या परिसरात दीड तासात 49 मिलिमीटर पाऊस झाला होता. या पावसाने कोल्हेवाडीलगत असलेल्या शेतातील वीज पुरवठा खंडित झाला होता. म्हणून मंगळवारी सकाळी महावितरणच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मदतीने वीज पुरवठा सुरळीत केला होता. गावातील शेतकऱ्यांचा कैवारी हरपला. अशी भावना परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आहे.

une-news">पुणे) : खडकवासला गावचे माजी सरपंच जयगुरु कालिदास मते (वय 43) यांचे मंगळवारी रात्री अपघाती निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, आई, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. 

....म्हणून यूपीतील चित्रकुट येथील महिलेने पुणेकरांचे मानले आभार

जयगुरु, हे मंगळवारी रात्री कोल्हेवाडी लगत असलेल्या त्यांच्या व चुलत्याचे शेत आहे. तेथे छोट्या ट्रॅक्टरने नांगरत होते. त्यावेळी, ट्रॅक्टर नांगरासह उलटला. तो त्यांच्या छातीवर पडला. त्यावेळी, त्यांच्या समवेत कोणी नव्हते. ते तसेच पडून होते. शेतातून रोजच्या वेळी घरी न आल्याने त्यांच्या पत्नीने त्यांना मोबाईलवर संपर्क साधला. पण त्यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यांच्या पत्नीने जयगुरुचे भाऊ जयनाथ यांना हे सांगितले. ते शेतात गेल्यावर त्यांना हे दृश्य दिसले. त्यांनी तातडीने ग्रामस्थांना बोलवून त्यांना दवाखान्यात नेले. तेथे उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. 

पुण्यातील ८० वर्षांच्या आजीबाई जिंकल्या कोरोना विरूध्दची लढाई

जयगुरु हे २००७ ते २०१२मध्ये ग्रामपंचायतचे सदस्य होते. त्या कालावधीत काही वर्ष ते गावचे सरपंच होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हा सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले होते. खडकवासला गावातील श्री भैरवनाथ विठ्ठल मंदिर ट्रस्टचे विश्वस्त होते. गावातील जीवन साधना पाणीपुरवठा सोसायटीचे अध्यक्ष होते. त्यांच्याकडे म्हशी असल्याने खडकवासला गावात कोल्हेवाडीत त्यांनी डेअरी सुरू केली होती. ते स्वतः शेती करीत होते. शेतकऱ्यांना सतत मदत करण्यात पुढे असे. कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांना भेटून सांगणे त्याचा पाठपुरावा करणे. विविध ठिकाणी शेतकरी मेळावे घेणे, शेतकऱ्यांना घेऊन कृषी प्रदर्शनाला भेट देणे असे काम करीत होते.  

वाचा दिलासादायक बातमी : पुण्याची मुळा-मुठा होतेय स्वच्छ

शेतकऱ्यांचा कैवारी हरपला… 
अगदी सोमवारी रात्री या परिसरात दीड तासात 49 मिलिमीटर पाऊस झाला होता. या पावसाने कोल्हेवाडीलगत असलेल्या शेतातील वीज पुरवठा खंडित झाला होता. म्हणून मंगळवारी सकाळी महावितरणच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मदतीने वीज पुरवठा सुरळीत केला होता. गावातील शेतकऱ्यांचा कैवारी हरपला. अशी भावना परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आहे. गावातील नवयुग तरुण मंडळ, मधली तालीम तरुण मंडळ याचे क्रियाशील पदाधिकारी होते. तरुणांच्या ते लोकप्रिय असल्याने त्यांच्या अपघाताची माहिती मिळताच अनेक तरुणांनी रुग्णालया बाहेर गर्दी केली होती. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former Sarpanch of Khadakwasla jayguru mate died in accident