बारामतीत चार जण कोरोना पॉझिटिव्ह; एकूण बाधितांची संख्या पोहचली..

Four people were Positive in Baramati
Four people were Positive in Baramati

बारामती : काल दिवसभरात घेतलेल्या 46 नमुन्यांपैकी चार जण कोरोनाबाधित असल्याचे आज सकाळी मिळालेल्या अहवालावरुन निष्पन्न झाले असून अद्याप तीन अहवाल येणे बाकी आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी ही माहिती दिली. 

कॅनॉलमध्ये वाहत चाललेल्या 'त्या' मायलेकींच्या मदतीला धावला देवदूत!​

काल पहिल्या टप्प्यात 37 नमुने प्राप्त झाले होते, त्यापैकी 32 जण निगेटीव्ह तर, चार जण पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते. आज सकाळपर्यंत केलेल्या तपासणीमध्ये उर्वरित सहा जण निगेटीव्ह असून तीन जणांचे अहवाल येणे बाकी आहे. 

ज्यांना कोरोना निष्पन्न होतो आहे, अशा कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीही कोरोनाबाधित असल्याचे दिसत आहे. परस्परांच्या संपर्कामुळे ही बाब होत आहे. दरम्यान बारामतीतील कोरोनाबाधितांची संख्या 119 वर पोहोचली असून त्यापैकी 11 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये 62 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले असून 46 रुग्ण उपचार घेत आहेत.   
 

दरम्यान, बारामतीतील कोरोनाबाधितांची संख्या तुलनेने कमी आहे व बरे होऊन घरी जाणाऱ्यांचे प्रमाणही उत्तम आहे. काळजी आहे, ती मृत्यूदर कमी करण्याची. दवाखान्यात उशीरा दाखल होण्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले. या संदर्भात आता व्यापक जनजागृती करण्याचे ठरविले असून शहरासह ग्रामीण भागातही लोकांनी कसलीही लक्षणे दिसताच नजिकच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे व त्यांच्या सल्ल्यानुसार कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. वेळेत उपचार मिळाले तर मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल, त्यामुळे लोकांनी दुखणे अंगावर अजिबात काढू नये, तातडीने तपासण्या करुन घ्याव्यात असे ते म्हणाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 क्लिक करा

मिलिंद संगई, बारामती 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com