चार वर्ष वयाच्या बेवारस बालिकेचे आढळले पार्थिव

मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्ट
death
deathsakal

इंदापूर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी ( ता. इंदापूर ) ग्रामपंचायत हद्दीतकोळेकर वस्तीनजीक ब्राम्हणतळ ओढा परिसरात बुधवार दि.२५ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता चार वर्ष वयाच्या बेवारस बालिकेचे पार्थिवआढळून आले. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

death
२५ महिला बचत गटांची पुरग्रस्थांना मदत

या परिसरात गुराखी आपली जनावरे चारण्या साठी गेले असता त्यांना हे पार्थिव आढळून आल्याने त्यांनी तात्काळ याची कल्पनागावचे सरपंच सिताराम जानकर यांना दिली. त्यांनी तात्काळ 108 रुग्णवाहिकेस पाचारण करून इंदापूर पोलीस ठाण्यास ही माहिती दिली.

death
आम्ही लोकशाही पध्दतीने आंदोलन करतो

त्यानंतर सरपंच जानकर,उपसरपंच हनुमंत जमदाडे, ग्रामपंचायत सदस्य सतिश चित्राव, रवींद्र सरडे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. तोपर्यंत सरडेवाडी टोल नाक्याचीरुग्ण वाहीका व महाराष्ट्र सुरक्षा दलाचे अविनाश बोरसे, विनोद पवार व टोलकर्मचारीसलमान पठाण, राहुल कदम, अनिलतरंगेघटनास्थळी आले. त्यांनी पार्थिव इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात पुढील कार्यवाही साठी आणले असून पोलीस कार्यवाही सुरू झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com