esakal | पुण्यातील नागरिकांत श्‍वसनाच्या आजारांत ४० टक्‍क्‍यांनी वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Sickness

दिवाळीत आणि त्यानंतर आत्तापर्यंत श्‍वसनाच्या आजारांचे प्रमाण 40 टक्‍क्‍यांनी वाढल्याचे निरीक्षण पुण्यातील छातीविकारतज्ज्ञांनी नोंदविले आहे. गेल्या वर्षापेक्षा आतषबाजीचे प्रमाण कमी दिसले असले, तरीही हवेतील बदलांमुळे फटाक्‍यांच्या प्रदूषणाचे दुष्परिणाम रुग्णांवर झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यातील नागरिकांत श्‍वसनाच्या आजारांत ४० टक्‍क्‍यांनी वाढ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - दिवाळीत आणि त्यानंतर आत्तापर्यंत श्‍वसनाच्या आजारांचे प्रमाण 40 टक्‍क्‍यांनी वाढल्याचे निरीक्षण पुण्यातील छातीविकारतज्ज्ञांनी नोंदविले आहे. गेल्या वर्षापेक्षा आतषबाजीचे प्रमाण कमी दिसले असले, तरीही हवेतील बदलांमुळे फटाक्‍यांच्या प्रदूषणाचे दुष्परिणाम रुग्णांवर झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दिवाळीनंतर काही दिवसांत श्‍वसनाच्या समस्या असलेल्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 40 टक्के वाढले आहे, अशी माहिती कोलंबिया एशिया हॉस्पिटलचे सल्लागार डॉ. अरुण सुराडकर यांनी दिली. 

आमदार होण्याचा प्रयत्न करु नको, नाहीतर...; मनसेच्या रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी

फटाक्‍यांमुळे हवेत सल्फर-डायऑक्‍साइड, कार्बन-डायऑक्‍साइड आणि मोनोऑक्‍साइड मोठ्या प्रमाणात पसरतात. त्यामुळे श्‍वसनसंस्था आणि मेंदूवर दुष्परिणाम होतो. विशेषतः लहान मुले तसेच आजारी व्यक्ती, मधुमेहींना याचा सर्वाधिक त्रास होतो. 

सुप्रिया सुळे पहिल्या महिला मुख्यमंत्री चालतील का? चंद्रकांत पाटलांनी दिलं उत्तर

डॉ. महेश लाखे म्हणाले, ‘‘श्‍वास घेण्यात अडचण, वाहणारे नाक, घसा खवखवणे, छातीत संक्रमण आणि त्रासदायक दमा अशा सामान्य तक्रारी समोर येत आहेत. प्रदूषणामुळे विषाणूजन्य आणि बॅक्‍टेरियाचा न्यूमोनिया होण्याची शक्‍यता वाढते. ज्यामुळे फुप्फुस व कर्करोगाचा आजार असलेल्या रुग्णांना ‘सीओपीडी’ आणि दम्याचा त्रास होऊ शकतो.’

सात महिन्यानंतर सुरू होणार शाळा; नववी ते बारावीचे वर्ग भरणार!

  • प्रदूषणाचे दुष्परिणाम
  • दमा तसेच ॲलर्जी वाढते 
  • डोळ्यांचा दाह 
  • डोकेदुखी, धाप लागणे 
  • झोप येणे, मळमळ, उलट्या 

Bharat ke Mahaveer: पुण्याचा रिक्षावाला दिसणार 'डिस्कव्हरी'वर; लॉकडाउनमध्ये स्थलांतरितांना केली होती मदत!

दिवाळीनंतर दरवर्षी श्‍वसनाच्या विकाराच्या रुग्णांची संख्या वाढते. या वर्षीही ती वाढली आहे. यंदा फटाके वाजविण्याचे प्रमाण कमी असले, तरीही हवामानातील बदलाचा परिणाम झाला आहे.  
- डॉ. नितीन अभ्यंकर, छातीविकारतज्ज्ञ 

Edited By - Prashant Patil