Pune Crime News : बनावट भाडेकरार करून घरमालकाची फसवणूक; वकिलासह भाडेकरूवर गुन्हा दाखल

भाडेकरू, त्याची पत्नी आणि नोटरी करणाऱ्या वकिलाविरुध्द गुन्हा दाखल
fraud with landlord making  forged agreement Case against lawyer pune crime police
fraud with landlord making forged agreement Case against lawyer pune crime policesakal

पुणे : वकिलाच्या मदतीने बनावट भाडेकरार करून घरमालकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भाडेकरू, त्याची पत्नी आणि नोटरी करणाऱ्या वकिलाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

fraud with landlord making  forged agreement Case against lawyer pune crime police
Pune News : कात्रज नवीन बोगद्या जवळ विचित्र अपघात; अपघातात तीन कारचा चक्काचूर

याप्रकरणी बीना मधुकर सुरवडे (वय ६०, रा. गुरूनानक नगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रियाज महम्मद हुसेन शेख (वय ५२), मुमताज रियाज शेख आणि सुधीर श्रावण सोनवणे (वय ५५, साईनाथ नगर, पिंपळे गुरव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

fraud with landlord making  forged agreement Case against lawyer pune crime police
Pune Crime News : रेल्वेचे बुकिंग रद्द करणे पडले साडेतीन लाखांना

पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाज शेख हा भाडेकरू असून, त्याने फिर्यादीची सदनिका भाडेतत्त्वावर घेण्यासाठी १० फेब्रुवारी २०२२ ते ९ जानेवारी २०२३ पर्यंत ११ महिन्यांचा भाडेकरार केला होता.

fraud with landlord making  forged agreement Case against lawyer pune crime police
Pune News : "रीड टू मी ” क्रीएटिव्ह चॅम्पियन स्पर्धेत साधना विद्यालय अव्वल

परंतु आरोपी शेख याने नोटरी करणाऱ्या वकिलाशी संगनमत करून पाचशे रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर १२ डिसेंबर २०१९ ते १२ डिसेंबर २०२४ असा ६० महिन्यांचे बनावट भाडेकरारपत्र तयार करून घेतले.

त्यात दस्तनोंदणी करताना या सदनिकेसाठी फिर्यादीला ३० लाख रुपये रोख रक्कम दिल्याचे नमूद केले. तसेच, फिर्यादी आणि त्यांचे पती मधुकर यांच्या बनावट सह्या करून फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बिराजदार करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com