महत्वाची बातमी : पुणे मार्केट यार्ड सुरू करण्याबाबत मोठा निर्णय; वाचा सविस्तर

pune.jpg
pune.jpg

मार्केट यार्ड : गुलटेकडी मार्केट यार्डातील फळे-भाजीपाला बाजार मंगळवार (ता. २) पासून पुर्णपणे सुरू करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. यापुढे बाजारात येणाऱ्या सर्व शेत मालाच्या वाहनांना प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी दिली.

कोरोनाच्या विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाजार समितीने विविध उपाय योजना करून रविवारपासून तरकारी, फळे, कांदा-बटाटा, केळी आणि पान विभाग सुरू करण्यात आले होते. परंतु रविवारी आणि सोमवारी बाजारात १० ते १५ टक्केच शेतमालाची अवाक झाली. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात प्रशासक बी जे. देशमुख यांच्या उपस्थित अडते असोसिएशनची बैठक पार पडली. उपसचिव सतीश कोंडे, विभाग प्रमुख बाबा बिबवे, दत्तात्रय कळमकर, अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, उपाध्यक्ष राजेंद्र कोरपे, राजेंद्र चोरगे, विलास थोपटे, संतोष नांगरे, बापू भोसले उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, फळे, भाजीपाला बाजार सुरू झाल्यानंतर दोन दिवसांत फळे व भाजीपाल्याची आवक कमी होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित विभागांचे प्रमुख, अडते संघटना, कामगार यांच्याशी चर्चा केली. बाजारात गर्दी होणार नाही, सर्व नियमांचे पालन केले जाईल. तसेच सर्व अडत्यांनी काम केल्यामुळे गर्दीवर परिणाम होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. त्यामुळे फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा विभाग पुर्वीप्रमाणे पुर्णपणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करणे बाजार घटकांना बंधनकारक राहील. ओळखपत्र असणाऱ्यांना बाजार आवारात प्रवेश दिला जाणार आहे. परवाना नसलेल्या खरेदीदारांना परवाना देण्याची व्यवस्था केली असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

दुसऱ्या दिवशीही आवक कमीच- फळे, भाजीपाला आवारात दुसऱ्या दिवशीही शेत मालाची आवक कमीच झाली.  सोमवारी मुख्य बाजारासह मोशी आणि उत्तमनगर उपबाजारात एकूण ३१६ वाहनांतून ७४७० क्विंटल फळे व भाजीपाल्याची आवक झाली.

मुख्य बाजारात शेतमाल विक्रीविना पडून- बाजारात शेतीमालाची अवाक कमी असूनही दुपारी बारानंतरही बाजारातील गाळ्यांवर शेतमाल विक्रीविना पडून होता. त्यामुळे शेतीमाल आला तरी त्याप्रमाणात ग्राहक ही बाजारात येणे गरजेचे असल्याचे अडत्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com