महाराष्ट्रानं पुणे जिल्ह्यातल्या 'या' गावाचा आदर्श घ्यावा; 100टक्के लॉकडाऊन!

Talegaon-Lockdown
Talegaon-Lockdown

तळेगाव स्टेशन : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून तळेगाव स्टेशन परिसरात दोन दिवसीय संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. याला तळेगावकरांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिल्याने याचा चांगला परिणाम जाणवून आला. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्याने आणखी पाच दिवस असेच संपूर्ण लाॅकडाऊन करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

औषधे आणि रुग्णालय या अत्यावश्यक सेवा वगळता तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत गुरुवारी (ता.९) आणि शुक्रवारी (ता.१०) असा दोन दिवसीय संपूर्ण लॉकडाऊन पाळण्यात आला. भाजीपाला तसेच किराणा विक्री बंद राहणार असल्याने नागरिकांनी आदल्या दिवशीच तशी व्यवस्था करून ठेवली होती. त्यामुळे या दोन दिवशी कुणीही खरेदीसाठी घराबाहेर पडले नाही.

पोलिसांनी रस्त्यावर फिरणाऱ्या प्रत्येकाची चौकशी केली. विनाकारण फिरणाऱ्यांचे प्रमाण लाॅकडाऊनच्या या दोन दिवसांत अगदी नगण्य होते. गुरुवारी (ता.९) सायंकाळी तळेगाव-दाभाडे पोलिसांनी गाव भागात संचलन केले. स्टेशन परिसरातील मराठा क्रांती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्टेशन चौक, वीरचक्र चौक आदी वर्दळीच्या ठिकाणी संपूर्ण शुकशुकाट जाणवला. तुलनेने गाव भागात मात्र काही प्रमाणात नागरिक बेफिकीरपणे घराबाहेर फिरताना दिसले.

संपूर्ण लाकडाऊनचा फाॅर्मूला परिणामकारक ठरत असल्याने आठवड्यातून फक्त दोन दिवस भाजीपाला, किराणा आणि तत्सम अत्यावश्यक सेवा खुल्या ठेवाव्यात आणि आठवड्यातील इतर पाच दिवशी संपूर्ण लाॅकडाऊन लागू करण्याच्या तयारीत स्थानिक प्रशासन आहे. नागरिकांचीही तशीच मागणी आहे. त्यामुळे कोरोनाला लवकरात लवकर आळा घालण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राने तळेगाव येथे राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनचा आदर्श घ्यावा. आणि आपल्या गावात, शहरातही तशीच अंमलबजावणी करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com