पुणेकरांनो, बघा 'हा' भाग कसा झाला कोरोनामुक्त?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

वडगावशेरी येथील गणेशनगर, रामनगर, मतेनगर  येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने तो भाग सील करण्यात आला होता. सर्व रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहे. सर्वांची प्रकृती उत्तम आहे.

रामवाडी : वडगावशेरी येथील गणेशनगर, रामनगर, मतेनगर  येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने तो भाग सील करण्यात आला होता. सर्व रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहे. सर्वांची प्रकृती उत्तम आहे.

- विद्यार्थ्यांनो, परीक्षा रद्द केल्यास 'कोरोना बॅच'चा शिक्का मारला जाणार

25 दिवस होऊन गेले सदर ठिकाणी  एक ही कोरोना बाधित रुग्ण आढळला नसल्याने ते ठिकाण कंटेन्मेंट  झोन मधुन वगळण्यात यावे अशी मागणी स्थानिक प्रतिनिधी भैय्यासाहेब जाधव यांनी पुणे महानगर पालिकेच्या आयुक्तांकडे लेखी स्वरूपात  केली होती. सदर ठिकाणे पुर्ण माहिती घेतल्यानंतर  प्रतिबंधित क्षेत्रातून पालिकेकडून या ठिकाणची बंदी उठवण्यात आली.

- आता महिलाही मशिदीत नमाज अदा करणार? सुप्रीम कोर्टाने केंद्रासह वक्फबोर्डाला पाठवली नोटीस

गणेशनगर, रामनगर  भागात एकाच कुटुंबातील सर्वात जास्त रुग्ण आढळत असल्याने इतर नागरिकांच्या आरोग्य सुरक्षितेसाठी हे ठिकाण कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले होते. गजबजलेला भाग असून, ही त्या ठिकाणच्या रहिवाशांनी अत्यंत काटेकोरपणे प्रशासनाच्या नियमांचे पालन केल्यामुळे  रेडझोनमधून ते ग्रीन झोनमध्ये आपला भाग आणला यामुळे सध्या त्या ठिकाणांचे सगळीकडे कौतुक होत आहे.

- मोठी बातमी : 'या' भागातील शाळा सुरु होणार? ऑनलाइन अॅडमिशनला सुरुवात!

एप्रिल महिन्यात गणेशनगर येथे  कोरोना बाधित 10 रुग्ण आढळले तर रामनगर येथे पाच आणि मतेनगर येथे एक अशी रुग्णांची संख्या होती.   कंटेन्मेंट झोन मधुन     नागरिकांनी ये जा करू नये यासाठी हे ठिकाणे सील करण्यात आली होती. 25 दिवस होऊन गेल्याने अद्याप एक ही कोरोना बाधित रुग्ण न आढळल्याने त्या ठिकाणची बंदी उठवण्यात आली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटून लेखी स्वरूपात पत्र दिले होते. सदर ठिकाणी नागरिकांनी  प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्याने एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नसल्याने बंदी उठवण्यात आली. सर्व श्रेय हे या भागातील नागरिकांना देतो. त्यांनी संयम राखला नियम पाळले त्यामुळेच शक्य झाले आहे - भैय्यासाहेब जाधव, नगरसेवक  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshnagar, Ramnagar area became corona free