
कृषी पंपाच्या केबल चोरणाऱ्या टोळीला अटक; तीन वर्षांनी पोलिसांना यश
नारायणगाव(pune) : येडगाव धरण(Yedgav Dhran) जलाशयातील शेकडो कृषी उपसा जलसिंचन (Jalsinchan) वीज पंपाच्या सुमारे 10 लाख रुपयांच्या केबलची (Cable) चोरी करणाऱ्या टोळीला नारायणगाव (NarayanGav) पोलिसांनी अटक केले आहे. मागील 3 वर्षे धुमाकूळ घालून शेतकऱ्यांना(Farmer) जेरीस आणले होते. या चोरट्यांची माहिती देणाऱ्यासाठी शेतकऱ्यांनी 51 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. या प्रकरणी मंगेश मधे, शेखर शर्मा, संजय कोरडे (सर्व रा. कैलासनगर, येडगाव, ता.जुन्नर ), विजय केदारी (रा. सावरगाव, ता.जुन्नर,जि. पुणे) यांना मंगळवारी (ता.१०) रात्री अटक केले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. केबल मधील तांबे धातूची खरेदी करणाऱ्या मंचर ( ता.आंबेगाव) येथील व्यापाऱ्यांचे नाव पोलिसांना सांगितले आहे. (narayangav gang arrested for stealing agricultural pump cables after 3 years)
हेही वाचा: Pune lockdown:लॉकडाऊनमुळे जगणं अवघड झालंय साहेब... काही तरी मदत करा..
येडगाव धरण जलाशयात गणेशनगर, इंदिरानगर, दोन देऊळ येथे शेतकऱ्यांच्या कृषी उपसा जलसिंचन योजनेचे सुमारे 500 कृषी पंप आहेत. प्रत्येक कृषी पंपाला किमान 12 हजार रुपयांची केबल आहे. मागील तीन वर्षांपासून रात्रीच्या वेळी येथील कृषी पंपाच्या केबलची सातत्याने चोरी होत होती. मात्र, चोरांचा तपास पोलिसांना लागत नव्हता. सततच्या केबल चोरीमुळे शेतकरी हतबल झाले होते. ६ एप्रिल २०२१ रोजी येडगाव धरण जलाशयातील दोन देऊळ येथील १३ कृषी पंपाच्या केबलची चोरी झाली होती. शेतकऱ्यांनी नवीन केबल टाकून कृषि पंप सुरू केले. त्या नंतर २३ एप्रिल २०२१ रोजी पुन्हा येथील बारा कृषी पंपाच्या केबलची चोरी झाली होती. वारंवार चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोध लागत नसल्याने पोलिसांच्या कार्यपद्धती बाबत नाराजी व्यक्त केली होती. चोरट्यांची माहिती देणाऱ्या व्यक्तीला ५१ हजार रुपयांचे बक्षीस बाधित शेतकऱ्यांनी जाहीर केले होते.
हेही वाचा: पुण्यावर आलेलं ऑक्सिजनचं संकट; 2 प्रकल्प अचानक पडले बंद
''चोरटे केबलमधील तांबे धातूच्या तारेची विक्री भंगार व्यावसायिकांना करत असल्याचा अंदाज व्यक्त होत होता. या वरून पोलिसांनी काही भंगार व्यावसायिकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून चोरट्याचा शोध लावण्यात यश मिळवले. जुन्नर पोलिस कोठडीतील काही आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने जुन्नर न्यायालयाने आरोपींचा जमीन मंजूर केला असून पुढील तपास सुरू ठेवण्याची सूचना न्यायालयाने केली आहे.'' अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक ताटे यांनी दिली.
हेही वाचा: दहावीच्या अंतर्गत मुल्यमापनासाठी ‘व्हॉटस्ॲप’चा सर्वाधिक वापर
सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक ताटे, हवालदार काठे,पालवे, लोंढे, केळकर, सचिन कोबल,वाघमारे यांचे पथकाने केली आहे.
हेही वाचा: पुण्यावर आलेलं ऑक्सिजनचं संकट; 2 प्रकल्प अचानक पडले बंद
Web Title: Gang Arrested For Stealing Agricultural Pump Cables After 3
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..