लॅाकडाउनच्या काळात छंद जपत साकारली इको फ्रेंडली गणेशमूर्ती

ganpat shitole.jpg
ganpat shitole.jpg

हडपसर (पुणे) : लॅाकडाउनच्या काळात अनेकांना वेळ कसा घालवायचा हा प्रश्न पडतो आहे. मात्र, डॅा. गणपत शितोळे यांनी ही संधी समजून या काळात इको फ्रेंडली गणपती बनविणे, वॉटर कलर व अक्रेलीक कलर पेंटिंग, स्कल्पचर ( टाकाऊ झाडांच्या मुळापासून प्रतिकृती बनविणे) फोटोग्राफी, हार्मोनियम, गायन इ. छंद आपला डॉक्टरकी व्यवसाय सांभाळून या वेळेचा सदुपयोग करून घेतला आहे. तसेच ते इतरांना देखील हे छंद आपल्या आवडीनुसार जोपण्यासाठी ते प्रोत्साहन देत आहेत.

 
डॅा. शितोळे हे शाडू मातीपासून पर्यावरण पूरक अशा गणपती मूर्ती हाताने बनवितात आणि इतर लोकांना सुद्धा पर्यावरण पूरक मूर्तीच बसवा आणि पर्यावरण वाचवा असा संदेश सोशल मिडयाच्या माध्यमातून देत आहेत. लॅाकडाउनमध्ये ज्या लोकांना इको फ्रेंडली गणपती बनविण्याची इच्छा आहे, त्यांना ते मोफत प्रशिक्षण देत आहेत. आवडीनिवडींना आपण आयुष्यात कुठेतरी जागा द्यायलाच हवी, या आयुष्यात एक तरी छंद जोपासावा कारण तीच आपली खरी ओळख असते, त्यातूनच आपल्याला खरंखुरं समाधान मिळत असत असे डॅा. शितोळे यांच मत आहे. 

डॅा. शितोळे सकाळशी बोलताना म्हणाले, सध्या लॉकडाऊनमुळे अजिबात बाहेर न पडणे, व्यवसायातील चढ उतार, कोरोनाची धास्ती व त्याचे संकट, यामुळे सर्वांच्या मनावर एक प्रकारचा ताण आला आहे, या तणावापासून मुक्ती मिळण्यासाठीच मी हे छंद जोपासले आहेत. त्यामुळे वेळही जातो आणि मनावरील ताण देखील कमी होतो. माझ्या संपर्कात असलेले बरेच लोक फेसबुक, व्हाट्स ऍपच्या माध्यमातून प्रेरित झाले आणि त्यांनीही त्यांच्यामधील सुप्त कलागुण जागृत केले आणि या सुप्तकलेचा त्यांना लॉकडाऊनच्या काळात ताणतणाव कमी होण्यास खूप उपयोग होत आहे. विरंगुळ्यासाठी पुरेसा वेळ दिल्यानेच धावपळीच्या करियरचा त्रास होत नाही.

अात्तापर्यंत मी 2000 घरांमध्ये पर्यावरण पूरक अशी शाडू मातीची गणपती मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. सध्या कोरोना साथीमुळे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मला वेळच वेळ मिळाला आणि त्या वेळेचा मी भरपूर सदुपयोग करून घेतला, या लॉकडाऊनमध्ये रोज एक पेंटिंग करत आहे, असे जवळ जवळ 1२५ पेंटिंगस तयार झाले आहेत. त्यामुळे मोकळा वेळ कसा जातो ते समजत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com