बाप रे, घरातल्य सिलिंडरच्या टाकीलाच लागली आग...पुढं असं काही घडलं की...

bhor fire
bhor fire

भोर (पुणे) : भोर येथील चौपाटी परिसरातील घरात पेटलेला गॅस सिलिंडर महिलेने प्रसंगावधान राखून घराबाहेर आणला. त्यानंतर भोरमधील सह्याद्री सर्च अॅण्ड रेस्क्यू फोर्सच्या कार्यकर्त्यांनी जिवाची पर्वा न करता तो विझवला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. 

ही दुर्घटना मंगळवारी (ता. १४) सायंकाळी साडेसातच्या सुमारास चौपाटी परिसरातील संजय खामकर यांच्या घरात घडली. त्यांच्या पत्नी दीपाली यांनी साडेसातच्या सुमारास घरातील गॅस संपल्यामुळे सिलिंडरची टाकी बदलली. त्यानंतर त्यांनी लायटरने शेगडी पेटवली. मात्र, त्यावेळी सिलिंडरच्या रेग्युलेटरने पेट घेतला. त्यावेळी त्यांचा मुलगाही घरात होता. रेग्युलेटरजवळ आगीची ज्योत दिसू लागल्याने त्यांनी शेगडीचे बटन बंद केले. परंतु, रेग्युलेटरला जोडलेली नळी जळू लागली. त्यांनी पाणी ओतून ज्योत विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो अपयशी झाला. त्यामुळे त्यांनी प्रसंगावधान राखून रेग्युलेटरची नळी खेचून काढली आणि टाकी ओढत-ओढत घराबाहेर नेली. तोपर्यंत रेग्युलेटर जळून ज्योतीचे रुपांतर आगीत झाले आणि सिलिंडरची टाकी पूर्णपणे जळू लागली. 

या प्रकारामुळे दिपाली खामकर यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे शेजारील नागरिक गोळा झाले. कोणाला काय करावे, हे सुचत नव्हते. त्यावेळी चौपाटी परिसरातील सह्याद्री सर्च अॅड रेस्क्यू फोर्सचे सचिन देशमुख हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वीटा, फरशा, माती व वाळू सिलिंडरवर टाकून बादलीने पाण्याचा मारा करून आग विझवली. त्यामुळे पुढील दुर्घटना टळली. 

चौपाटी परिसरात खामकर यांच्या घराशेजारी मोबाईलचा टॉवर आहे. त्यामुळे आणि शेजारी लागून अनेक घरे व बंगले आहेत. त्यामुळे सिलिंडरचा स्फोट झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. परंतु, दीपाली खामकर आणि सचिन देशमुख यांनी प्रसंगावधान राखून केलेल्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला.

Edited by : Nilesh Shende

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com