पुण्यात 'या' दोन प्रायव्हेट लॅबमध्ये होणार कोरोनाचे निदान 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

कोरोनाची निदाच चाचणी करण्यासाठी पुण्यातील गोळविलकर मेट्रोपोलिस लॅब आणि ए. जी. लॅबोरेटरीजला भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (आयसीएमआर) मान्यता दिली आहे.  

पुणे  : केवळ सरकारी यंत्रणेतीन कोरोना निदानावर अवलंबन न रहाता आता मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळांनाही रोगनिदानाची परवानगी देण्याचे धोरण केंद्र सरकारने स्विकारले आहे. त्या अंतर्गत पुण्यातील गोळविलकर मेट्रोपोलिस लॅब आणि ए. जी. लॅबोरेटरीज येथे याचे निदान होणार आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोनाची निदाच चाचणी करण्यासाठी पुण्यातील गोळविलकर मेट्रोपोलिस लॅब आणि ए. जी. लॅबोरेटरीजला भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (आयसीएमआर) मान्यता दिली आहे.   

Corona Virus : कोरोना आपत्ती निवारणासाठी राजपत्रित अधिकार्‍यांकडून दोन दिवसाचे वेतन

आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार परदेशातून आलेल्या, कोरोना रुग्णाच्या  संपर्कात आलेल्या किंवा कोरोनाची लक्षणे असणाऱयांचे वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. त्यासाठी डॅक्टरांचे प्रस्क्रिप्शन आणि सरकारी ओळखपत्र अत्यावश्यक असल्याची माहिती पुण्याच्या गोळविलकर मेट्रोपोलिसचे मुख्य पॅथॉलॉजिस्ट मनीष कारेकर यांनी दिली.

coronavirus: रक्तदान करा, पण, दक्षता घेऊन...

कोरोनाची तपासणी 24 तासांमध्ये केली जाते. त्यात निदान झालेल्या कोरोनाच्या रुग्णाची माहिती तातडीने आयसीएमआरला कळविली जाते. या चाचणीसाठी सरकारने मान्यता दिलेले किट उपलब्ध आहे. रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थ (स्वॅब) तपासणीसाठी घेतला जातो. या स्वॅब घेण्याच्या पद्धतीचे प्रशिक्षण प्रयोगशाळा तंत्रज्ञांना दिले आहे. यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण संरक्षक वेष, मास्क आणि गॉगल देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Golwilkar Metropolis Lab and A G Laboratories have been approved by the ICMR for corona test