जनतेला महाविकास आघाडीचे सरकार सर्वोतोपरी मदत करणार : खासदार सुळे यांचे आश्वासन

सावता नवले
Saturday, 17 October 2020

खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी (ता. 16) दौंड तालुक्यातील खानवटे येथे पुराच्या पाण्यामुळे मृत्यू झालेल्या चार लोकांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर अतिवृष्टी व मळद येथील तलाव फुटल्याने ओढयाला आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या गावांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खडकी येथे घेतलेल्या आढावा बैठकीत खा. सुळे बोलत होत्या. 

कुरकुंभ - अतिवृष्टी व पुरामुळे जिवीतहानी व शेतीचे नुकसान झालेल्या जनतेनला राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी (ता. 16) दौंड तालुक्यातील खानवटे येथे पुराच्या पाण्यामुळे मृत्यू झालेल्या चार लोकांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर अतिवृष्टी व मळद येथील तलाव फुटल्याने ओढयाला आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या गावांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खडकी येथे घेतलेल्या आढावा बैठकीत खा. सुळे बोलत होत्या. 

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून सरसकट भरपाई मिळावी : आमदार कुल

प्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती सारिका पानसरे, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, पंचायत समिती सभापती आशा शितोळे, उपसभापती नितीन दोरगे, सदस्य प्रकाश नवले, महसूल इत्यादी विभागांचे अधिकारी व स्वामी चिंचोली, खडकी, रावणगाव, नंदादेवी, मळद येथील ग्रामस्थ, विविध विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

'फी'न भरल्यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण रोखताय? शिक्षण विभागाचा शाळांना कडक इशारा

खा. सुळे पुढे म्हणाल्या पुराच्या पाण्यामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदत मिळू दिली जाईल. तसेच नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांनाही राज्य सरकार मदत करेल. त्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन खा. सुळे यांनी दिले.

पूलांच्या दुरुस्तीसह पिकांचे पंचनामे तातडीने करा- अजित पवार

यावेळी बोलताना रमेश थोरात म्हणाले मळद येथील तलाव फुटल्याने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सुप्रियाताईनी पुरामुळे बाधितांना भरपाई व तलावाच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याचे आदेश देऊन कडक कारवाईची मागणी केली.

ग्रामस्थांच्यावतीने मळद येथील तलाव निकृष्ट कामामुळे फुटला असून यासंदर्भात तक्रार करूनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे तलाव फुटून झालेल्या नुकसानीला संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना जबाबदार धरून गुन्हे दाखल करण्याची मागणी मळदचे माजी सरपंच दत्ताञेय शेलार केली. तर पूर व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी खडकीचे माजी सरपंच मंगेश शितोळे यांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अप्पासाहेब पवार तर सूत्रसंचालन उत्तम आटोळे यांनी केले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: government of Mahavikas Aghadi utmost help the people